Pune Crime | नायलॉन मांजाची विक्री करणारे व्यापारी जुनेद कोल्हापुरवाला व अदनान सय्यद यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नायलॉन मांजाच्या (Nylon Cats) वापर, विक्री आणि साठा करण्यास बंदी असताना पुणे शहरात (Pune Crime) नायलॉन मांजाची विक्री होत आहे. नायलॉन मांजा पक्षांसाठी आणि लोकांसाठी प्राणघात ठरत असल्याने पुणे शहरात (Pune Crime) त्याच्या विक्रीवर बंदी असताना त्याची विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक (Arrest) केली आहे.

जुनेद अकबर कोल्हापुरवाला Junaid Akbar Kolhapurwala (वय-29 रा. 246, गणेश पेठ, पुणे), अदनान असिफअली सय्यद Adnan Asif Ali sayyad (वय-19 रा. गणेश पेठ) यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana police station) भा.दं.वि कलम 336,188 व पर्यावरण कायदा (Environmental Law) 5,15 अन्वये गुन्हा (FIR)दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

राज्याच्या पर्यावरण विभागाचे मुख्य सचिवांनी (Chief Secretary, Department of Environment) प्लास्टिक, नायलॉन, सिंथेटिक मांजाने पक्षी व माणसांना होणाऱ्या दुखापतीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मांजा तयार करणाऱ्यांवर आणि वापर करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे पथक मांजाची विक्री कोठे होत आहे का याचा शोध घेत होते. त्यावेळी बोहरी आळीत एक दुकानदार चोरुन मांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दुकानात बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर दुकानावर छापा टाकून दुकानातील नॉयलॉन मांजाचे 19 रिळ व रोख रक्कम असा एकूण 49 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दुकानाच्या मालकांना बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime)

प्लॅस्टिक, नायलॉन, सिंथेटिक मांजाच्या वापरामुळे पक्षी आणि माणसांना गंभीर दुखापत होत असतात. त्यामुळे अशा प्रकारे मांजाची विक्री करु नये तसेच जवळ बाळगू नये असे आवाहन पुणे पोलिसांकडून (Pune Police) करण्यात आले आहे. अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असाही इशारा पोलिसांनी दिला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad),
सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), पोलीस अंमलदार अजय जाधव, अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, तुषार माळवदकर,
महेश बामगुडे महिला पोलीस अंमलदार मिना पिंजण, रुखसाना नदाफ यांनी केली.

Web Title : Pune Crime | Pune police crime branch arrests Junaid Abakbar Kolhapurwala and Adnan Asif Ali Syed for selling nylon cats

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्चPune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्याSupreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात