Pune Crime | व्याजाच्या पैशासाठी व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी, खासगी सावकाराला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सावकारीचा कोणताही परवाना नसताना 20 लाख रुपये व्याजाने (Interest) देऊन त्याच्या वसुलीसाठी शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी (Threat) दिल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. व्याजाच्या पैशासाठी व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सावकाराला गुन्हे शाखेच्या युनिट चारने (Pune Police Crime Branch) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत.

 

किशोर सदाशिव खळदकर Kishor Sadashiv Khaldakar (वय 38, रा. जातेगाव, ता. शिरुर Shirur) असे या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी नारायण रामलाल चौधरी Narayan Ramlal Chaudhary (वय 41, रा. योगेश्वर सोसायटी, वडगाव शेरी Wadgaon Sheri) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा कपड्याचा व्यावसाय आहे. कोरोना (Corona) काळात त्यांचा व्यावसाय अडचणीत आला. फिर्यादी यांनी किशोर खळदकर याच्याकडून दरमहा दर शेकडा 10 टक्के व्याजाने जुलै 2021 मध्ये 20 लाख रुपये घेतले होते. फिर्यादी हे आरोपीला दरमहा 2 लाख रुपये व्याज देत होते. डिसेंबर 2021 या महिन्याचे व्याज थकल्याने आरोपीने फिर्यादी यांच्या वाघोली (Wagholi) येथील दुकानात जबरदस्तीने घुसुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रारदार यांनी आरोपीविरुद्ध तक्रारी अर्ज दाखल केला होता.

तक्रारदार यांच्या तक्रार अर्जावरुन गुन्हे शाखा युनिट चार व सहाय्यक दुय्यम निबंधक सहकारी संस्था, ता. शिरुर यांनी संयुक्त कारवाई केली.
आरोपी खळदकर याच्याकडे कोणताही सावकारीचा परवाना नसताना दरमहा दर शेकडा 10 टक्के दराने व्याजाने पैसे देऊन कर्जदाराकडून कोरे चेक (Blank Check), कोरा स्टॅम्प (Blank Stamp) लिहुन घेत असल्याचे तक्रारीत निष्पन्न झाले.
आरोपीविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve)
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर (Police Inspector Jayant Rajurkar),
पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील (PSI Jaydeep Patil), महेंद्र पवार, राजस शेख, नागेशसिंग कुंवर, दिपक भुजबळ, प्रविण कराळे, शितल शिंदे, सागर वाघमारे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests moneylender for threatening to kill businessman for interest money

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा