Pune Crime | 3 पहाडी पोपट आणि 123 लव्हबर्डस् विक्रीच्या प्रयत्नात असलेल्याला गुन्हे शाखेकडून अटक (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अनधिकृतरित्या आणि विना परवाना पहाडी पोपट (Mountain Parrot) आणि बजरी जातीचे लव्हबर्डस् (Gravel Lovebirds) विक्री करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट एकच्या (Crime Branch Unit 1) पथकाने अटक (Arrest) केली आहे. त्याच्याकडून दोन लाख तीन हजार रुपये किमतीचे 3 पहाडी पोपट आणि 123 बजरी जातीचे लव्हबर्डस् जप्त करण्यात (Pune Crime) आले आहेत. याप्रकरणी रहेमतुल्ला शौकतउल्ला खान (Rahematullah Shaukatullah Khan) याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत (Wildlife Conservation Act) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे.

 

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी कर्मचारी मंगळवारी (दि.17) समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पेशंन वाला मशिद (Peshab Wala Mosque) समोरील रेशम हाऊसच्या टेरेसवर रहेमतुल्ला खान (वय-57) हा बेकायदेशिर पहाडी पोपट आणि लव्हबर्ड विकत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी महाराष्ट्र वन विभाग, वानवडी (Maharashtra Forest Department, Wanwadi) यांना याबाबत माहिती कळवली. वनरक्षक काळुराम कोंडीबा कड (Forest Ranger Kaluram Kondiba Kad) यांच्या मदतीने त्याठिकाणी छापा टाकला.(Pune Crime)

 

 

त्यावेळी बिल्डिंगच्या टेरेसवर आरोपी ने एकूण 3 पहाडी पोपट व 123 बजरी जातीचे लव्हबर्ड्स जाळीच्या पिंजऱ्यात निर्दयपणे कोंबून भरल्याचे आढळून आले. तसेच त्यांची कोणत्याही प्रकारची जीवीताची काळजी घेतली जात नसल्याचे दिसले. पक्षांची विक्री करण्यासाठी त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. या पक्षांची किंमत अंदाजे दोन लाख तीन हजार रुपये आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत यापेक्षा अधिक आहे. पोलिसांनी सर्व पक्षी ताब्यात घेतले असून त्यांना रेस्क्यु वाईल्ड लाईफ टीटीएस बावधन (Rescue Wildlife TTS Bawadhan) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने हे पक्षी कोठून आणले आणि तो कोणाला विकणार होता याची माहिती पोलीस घेत आहेत. तसेच या गुन्ह्यात आणखी कोण सहभागी आहे किंवा कोणती आंतरराज्य टोळी (Interstate Gang) यामध्ये आहे का याचाही तपास पोलीस घेत आहेत. याप्रकरणी वनरक्षक काळुराम कड यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad) करीत आहेत.

 

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले (Senior Police Inspector Sandeep Bhosale),
पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni),
पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, अजय जाधव, अय्याज दड्डीकर, इम्रान शेख,
अशोक माने, शशिकांत दरेकर, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests one who trying to sell 3 hill parrots and 123 lovebirds

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Esha Gupta Bedroom Photo | अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंची होतीये सर्वत्र चर्चा, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल…

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द, जाणून घ्या कारण

 

Black And Green Grapes | काळे की हिरवे, कोणती द्राक्षे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत? जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ