Pune Crime | घरफोडी, मोबाईल चोरी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरफोडी (Burglary), मोबाईल चोरी (Mobile Theft) करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट एकच्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सोन्या – चांदीचे दागिने (Gold – silver jewelry), मोबाईल जप्त करण्यात (Pune Crime) आले आहेत. आरोपींकडून 1 लाख 21 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विश्रामबाग पोलीस ठाण्यातील (Vishrambaug Police Station) दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

 

विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 7 मार्च रोजी यशोधन मधुकर नित्सुरे (Yashodhan Madhukar Nitsure) यांच्या घरामध्ये शिरुन चोरट्यांनी घरातील सोने – चांदीचे दागिने व मोबाइल असा एकूण 1 लाख 6 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. तर आदित्य जाधव (Aditya Jadhav) हे 20 जानेवारी रोजी टिळक रोड (Tilak Road) येथे हातगाडीवर नाष्टा करत होते. त्यावेळी त्यांनी त्यांचा मोबाईल बाजूच्या खुर्चीवर ठेवला होता. चोरट्यांनी जाधव यांचा मोबाईल चोरुन नेला होता. या दोन्ही गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट एक चे पथक करत होते. (Pune Crime)

आरोपींचा शोध घेत असताना हे गुन्हे आकाश उर्फ झुरळ्या विठ्ठल पोटोळो Akash aka Juralya Vitthal Potolo (वय – 22 रा. भवानी पेठ, पुणे) आणि रवि मनोज कोळी Ravi Manoj Koli (वय – 28 रा. कासेवाडी, भवानी पेठ – Bhavani Peth) यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपींनी दोन्ही गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींवर घरफोडी, चोरी, वाहन चोरी असे पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात 10 ते 15 गुन्हे दाखल आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), पोलीस अंमलदार, राहुल मखरे, अनिकेत बाबर, अशोक माने,
शशिकांत दरेकर, दत्ता सोनवणे, महेश बामगुडे, मिना पिंजण यांच्या पथकाने केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests two burglars

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा