Pune Crime | वाहन चोरी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक, 15 दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – (Nilesh Balasaheb Shivarkar) आणि प्रशांत संपत चव्हाण (Prashant Sampat Chavan) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव असून 15 गुन्हे (Pune Crime) उघडकीस आणले आहेत. लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना शुक्रवारी (दि. 29 एप्रिल) गुन्हे शाखा युनिट सहाच्या पोलिसांना माहिती मिळाली की, वाहन चोरी करणारे दोन सराईत वाघोली बाजारतळ येथे येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी निलेश शिवरकर (वय-33 रा. म्हातोबाची आळंदी, पानमळा, ता. हवेली), प्रशांत चव्हाण (वय-34 रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरुर, जि. पुणे) यांना दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीचा तपास केला असता आरोपींनी ही दुचाकी आळेफाटा येथून चोरल्याचे निष्पन्न झाले. (Pune Crime)

आरोपींनी न्यायालयात हजर करुन त्यांची 3 मे पर्यंत पोलीस कोठडी घेतली. पोलीस कोठडीत आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी पुणे शहर व वेगवेगळ्या ठिकाणाहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.आरोपींकडून 15 दुचाकी जप्त करुन 15 गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींनी हडपसर पोलीस स्टेशन (Hadapsar Police Station) -5, लोणीकंद पोलीस स्टेशन-4, चंदननगर पोलीस स्टेशन (Chandannagar Police Station) -2, कोंढवा पोलीस स्टेशन (Kondhwa Police Station) -1, कोथरुड पोलीस स्टेशन (Kothrud Police Station) -1, पुणे ग्रामीणच्या (Pune Rural) यवत पोलीस स्टेशन (Yavat Police Station) 1 आणि आळेफाटा पोलीस ठाण्यातील (alephata police station) 1 असे एकूण 15 गुन्हे उघडकीस आले आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane), सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil), पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले,
नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार,
ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests two car thieves, seizes 15 two wheelers

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा 

CM Uddhav Thackeray | ‘कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका’ ! CM उद्धव ठाकरेंचे पोलिसांना स्पष्ट निर्देश

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल; आता नेमके पर्याय काय ?, कोणती कलम लावण्यात आली ?

Rahul Gandhi | जाणून घ्या राहुल गांधी ज्या मैत्रिणीसाठी नेपाळला गेले ती कोण आहे नक्की?