पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यामध्ये गांजा (Marijuana) विक्रीसाठी आलेल्या दोन तस्करांना गुन्हे शाखा युनिट सहाच्या (Pune Police Crime Branch) पथकाने सपाळा रचून अटक (Arrest) केली. पोलिसांनी (Pune Police) आरोपींकडून गांजा (Ganja) आणि गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी (Scorpio car) असा एकूण 8 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. हनुमंत भाऊसाहेब कदम (Hanumant Bhausaheb Kadam), तुषार संजय झांबरे (Tushar Sanjay Zambare) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात (lonikand Police Station) एन.डी.पी.एस. अॅक्ट (N.D.P.S. Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.
गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी दोन व्यक्ती पुणे शहरामध्ये स्कॉर्पिओ गाडीतून गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लोणीकंद येथील बारवा मैल येथे सापळा रचून हनुमंत कदम (रा. मु.पो. कुसडगाव ता. जामखेड, जि. अहमदनगर-Ahmednagar), तुषार झांबरे (रा. मु. हिंगणी ता. आष्टी, जि. बीड-Beed) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या स्कॉर्पिओची झडती घतेली असता गाडीमध्ये 4 लाख 50 हजार रुपये किमतीचा 22 किलो गांजा सापडला. पोलिसांनी गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी असा एकूण 8 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (Pune Crime)
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane),
सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil), पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर,
कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे,
प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.
Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests two for selling ganja marijuana cannabis in Pune, seizes goods worth Rs 8.5 lakh
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Coconut Water Benefits | नारळ पाणी आरोग्यासोबतच वजन कमी करण्यासाठी फायद्याचं, जाणून घ्या
Gold Silver Price Today | सोने आणि चांदीच्या किंमतीत तेजी; जाणून घ्या