Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल (Unlicensed Pistol) बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने (Pune Police Crime Branch) अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी मंगेश दादु सोनावणे Mangesh Dadu Sonawane (वय – 26) त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल (Pistol) आणि एक जिवंत काडतुस (Cartridge) जप्त केले (Pune Crime) आहे.

 

मंगेश दादु सोनावणे (वय –  26 रा. मु. आगळंबे पोस्ट कुडजे, ता. हवेली, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttam Nagar Police Station) आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) कलम – 3 (25) व महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act) कलम 37 (1) (3) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime)

युनिट तीनचे पथक उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार मंगेश सोनावणे हा कोंढवे – धावडे (Kondhve – Dhavade) येथे पिकॉक लॉज समोर उभा असून त्याच्याकडे देशी बनावटी पिस्टल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक पिस्टल आणि एक काडतूस मिळून आले. पोलिसांनी त्याच्याकडून 40 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan), महिला पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पवार (PSI Tejaswi Pawar), पोलीस अंमलदार महेश निंबाळकर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, संजीव कंळबे, विल्सन डिसोझा, राकेश टेकावडे, दिपक क्षिरसागर, ज्ञानेश्वर चित्ते, कल्पेश बनसोडे, प्रताप पडवाळ, सतिश कत्राळे, भाग्यश्री वाघमारे यांनी केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :-  Pune Crime | Pune Police Crime Branch arrests unlicensed pistol criminal

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा