Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुण्याच्या गुन्हे शाखेकडून अटक, 2 पिस्टल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (criminal) पुणे गुन्हे शाखा युनिट तीनच्या (Pune Crime Branch Unit Three) पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीच्या दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे (Cartridges) जप्त केली आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime) एनडीए गेट नं.10 जवळील कोंढवे-धावडे बस स्टॉप जवळ केली.

 

अक्षय दिलीप रावडे (वय-24 रा. उत्सव बिल्डींग, किरकीटवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर
(Santosh Kshirsagar) व महेश निंबाळकर (Mahesh Nimbalkar) यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय रावडे हा कोंढवे-धावडे बस स्टॉप जवळील रोडवर थांबला आहे.
त्याच्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्टल असल्याची (Pune Crime) माहिती समजली.

 

पोलिसांनी एनडीए गेट नं. 10 जवळील बस स्टॉपजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 2 देशी बनावटीच्या पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 80 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी विरोधात सिंहगड (Sinhagad police station) व दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) गुन्हे दाखल (Pune Crime) आहेत.
आरोपीविरुद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे
(Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Inspector of Police Abhay Mahajan), पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे
(PSI Dattatraya Kale),पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, महेश निंबाळकर, विल्सन डिसोझा, संजिव कंळबे, कल्पेश बनसोडे, सुजित पवार,
सोनम नेवसे, दिपक क्षिरसागर, प्रकाश कट्टे, राकेश टेकावडे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :  Pune Crime | Pune police Crime Branch arrests unlicensed pistol holder, seizes 2 pistols

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Roshan Bhinder | वेब सीरिजच्या नावाखाली 37 लाखांच्या फ़सवणुकीप्रकरणी ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शिकेला अटक

Crime News | शाळेची बस सुटल्याने 14 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचं पाऊल

MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे