Pune Crime | अवैध सावकारी करुन खंडणी मागणाऱ्या व्यंकटेश चोक्कारपू, शांतीलाल पाटील, वसंत कुमार मिश्रा यांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरामध्ये अवैध सावकारी (Illegal Lenders) करुन खंडणी (Ransom) मागणाऱ्यांवर पुणे पोलिसांकडून (Pune Police) कारवाई करण्यात येत आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक एकच्या पथकाने (Anti Extortion Cell) तीन खासगी सावकारांना अटक (Arrest) केली आहे. आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी (Threat) दिली (Pune Crime) होती. आरोपींना सापळा रचून त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.

 

व्यंकटेश नागेंद्र चोक्कारपू Venkatesh Nagendra Chokkarpu (वय – 52 रा. 13/3 लिला निवास, साई सत्यम पार्क, वाघोली – Wagholi), शांतीलाल देवराम पाटील Shantilal Devram Patil (वय – 59 रा. लेन नं.6, साई सत्यम पार्क, वाघोली), वसंत कुमार राममिलन मिश्रा Vasant Kumar Rammilan Mishra (वय – 56 रा. घर नं 1247, साई सत्यम पार्क, लेन नं.7 वाघोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime)

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी शहरात अवैध सावकारी करणाऱ्याविरोधात कारवाई (Action) करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार खंडणी विरोधी पथक एकच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. तक्रारदार यांनी सुभाष मांडोळे (Subhash Mandole), व्यंकटेश चोक्कारपू व इतरांविरुद्ध अवैध सावकारी करुन खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) दिली होती. तक्रारीची चौकशी करुन पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास खंडणी विरोधी पथक एक चे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव (PSI Vikas Jadhav) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Senior Police Inspector Arvind Mane),
सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी (API Vivek Padvi),
पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan),
पोलीस अंमलदार, पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, मधुकर तुपसौदर्य, रविंद्र फुलपगारे, हेमा ढेबे, मिना पिंजण, किशोर वग्गू, चेतन चव्हाण, मारुती पारधी, नितीन कांबळे, रमेश चौधर, दुर्योधन गुरव, अमोल आवाड, विजय कांबळे, विवेक जाधव, नितीन रावळ, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, प्रविण कारळे, सचिन पवार, प्रदिप गाडे, कोळगे व तेजाराणी डोंगरे यांनी संयुक्तपणे केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Advt.

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests Venkatesh Chokkarpu Shantilal Patil Vasant Kumar Mishra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा