क्राईम स्टोरीताज्या बातम्यापुणे

Pune Crime | पुणे शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन ! 3500 गुन्हेगारांची धरपकड; पिस्तुल, 56 जिवंत काडतुसे, 79 खराब काडतुसे तसेच 970 बुलेट लिड जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहर आणि परिसरात गुंडगिरी आणि इतर गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रोज मोठ्या प्रमाणात शहरात गुन्हे (Pune Crime) घडत आहेत. या गुंडांना (Pune Criminals) जरब बसवण्यासाठी पोलिसांनी (Pune Police) विशेष कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले आहे. या अंतर्गत मध्यरात्री गुन्हे शाखा (Pune Police Crime Branch) तसेच पोलीस ठाण्यांमधील पथकांनी विशेष मोहीम राबवून शहरातील साडेतीन हजार सराईत गुंडांची झाडाझडती घेतली.

 

या कोम्बिंग ऑपरेशमध्ये असे आढळून आले की, सुमारे 685 गुन्हेगार मूळ पत्यावर राहत होते. पोलिसांनी या झाडाझडतीमधून दोन पिस्तुलांसह, काडतुसे, तलवारी, कोयते जप्त केले. तसेच चंदननगर भागातील एका हुक्का पार्लरवरही कारवाई केली. या कारवाईत हुक्कापात्र, तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. तसेच हुक्का पार्लरचा (Hookah Parlour In Pune) मालक सिद्धार्थ राजेश अष्टेकर Siddharth Rajesh Ashtekar (वय 25, रा. चंदननगर – Chandan Nagar) याला अटक केली. (Pune Crime)

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik), अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), उपायुक्त भाग्यश्री नवटके, प्रियंका नारनवरे, सागर पाटील, पौर्णिमा गायकवाड, रोहीदास पवार, वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलीस ठाण्याची पथके या मोहिमेत सहभागी झाले होते.

दोन पिस्तुलांसह 4 काडतुसे जप्त, 29 जणांना अटक
गुन्हे शाखेने बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी 3 ठिकाणी कारवाई केली.
या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपींकडून दोन पिस्तुलांसह चार काडतुसे, 79 खराब काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला.
बेकायदा तलवार, कोयते बाळगल्याप्रकरणी 29 जणांना अटक केली. त्यांच्याकडून दोन तलवारी, 21 कोयते जप्त केले.

 

भारती विद्यापीठ परिसरातील फरार गुन्हेगार प्रथमेश चंद्रकांत कांबळे (वय 18, रा. कात्रज) याला जय विटकर, अनिल विटकर (रा. लाल चाळ, गोखलेनगर) यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली.
वडकी गावातील शेखर अनिल मोडक (वय 27), पंकज अभिमन्यू रणवरे (वय 35, रा. रामकृष्ण अपार्टमेंट, बाणेर रस्ता) यांना अटक करण्यात आली.
दोघांकडून दोन पिस्तुल, चार काडतुसे जप्त करण्यात आली.

 

पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीत (Janta Vasahat) गुन्हे शाखेच्या युनिट एकने केलेल्या कारवाईत 56 जिवंत काडतुसे,
79 खराब काडतुसे तसेच 970 बुलेट लिड जप्त केले.
या प्रकरणी दिनेशकुमार कल्लूसिंग सरोज (वय 34, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) याला अटक केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch combing operation in city Arrest of 3500 criminals Pistols 56 live cartridges 79 bad cartridges as well as 970 bullet lids seized

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Back to top button