Pune Crime | 10 टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या खाजगी सावकारावर गुन्हे शाखेकडून कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दरमहा 10 टक्के व्याज वसुल केल्यानंतरही आणखी पैशांची मागणी करुन…
Pune Crime Pune Police Crime Branch cracks down on private lenders
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दरमहा 10 टक्के व्याज वसुल केल्यानंतरही आणखी पैशांची मागणी करुन धमकाविणाऱ्या खासगी सावकारावर गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनने (Anti Extortion Cell, Pune) कारवाई केली आहे. संदीप दत्तात्रय भगत Sandeep Dattatraya Bhagat (वय – 36 रा. जय भवानीनगर, पौड रोड, कोथरुड) असे या सावकाराचे (Pune Crime) नाव आहे.

 

खंडणी विरोधी पथक दोनकडे प्राप्त झालेल्या तक्रार अर्जावरुन ही कारवाई (Pune Crime) करण्यात आली. फिर्यादी यांनी संदीप भगत याच्याकडून दरमहा 10 टक्के व्याजाने 1 लाख रुपये घेतले होते. पैसे देताना संदीप भगत याने 10 टक्क्याने 10 हजार रुपये कपात करुन 90 हजार रुपये फिर्यादी यांना दिले. फिर्यादी यांनी मुद्दल आणि व्याज मिळून 3 लाख 10 हजार व दंड 4 हजार असे एकूण 3 लाख 14 हजार रुपये रोख व ऑनलाइन परत केले. पैसे परत केले असताना संदीप भगत याने फिर्यादी यांच्या नावावर असलेल्या दोन दुचाकी जबरदस्तीने आपल्याकडे ठेवून घेतल्या. तसेच आणखी 70 हजार रुपयांची मागणी करुन जीवे मारण्याची धमकी (Death Threat) दिल्याचे तक्रारीत नमूद केले. (Pune Crime)

प्राप्त तक्रारीवरुन खंडणी विरोधी पथक दोनने खाजगी सावकार (Private Moneylender) संदीप भगत याच्याविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) आयपीसी 386, 387, 452 व महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत (Maharashtra Lenders Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पुढील तपास कोथरुड पोलीस करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajagane), पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), पोलीस अंमलदार विजय गुरव, शैलेश सुर्वे, प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, अमोल पिलाने, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, सैदाबा भोजराव, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, किशोर बर्गे, रवि संकपाळ, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch cracks down on private lenders

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Total
0
Shares
Related Posts