Pune Crime | पुणे शहरात चंदन चोरी करणाऱ्या ‘पुष्पा गँग’च्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, 6 गुन्हे उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरात चंदन चोरी (Sandalwood theft) करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या (Crime Branch Unit 3) पथकाने सापळा रचून बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. पोलिसांनी (Pune Police) आरोपींकडून सहा गुन्हे उघडकीस आणून चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी ही कारवाई सिंहगड रोडवरील पु.ल. देशपांडे उद्यानाजवळ (Pune Crime) केली.

 

अशोक मच्छिंद्र तांदळे (वय- 30 रा. कोल्हेवाडी, ता. हवेली), लहु तानाजी जाधव (वय-32), महादेव तानाजी जाधव (वय-30), हनुमंत रमेश जाधव (वय-30 तिघे रा. चौफुला चौक, ता. दौंड, जि. पुणे), रामदास शहाजी माने (वय-28 रा. मु.पो. मोडवे खोमणे वस्ती, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime)

 

सहकारनगर येथील अरनेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल (Araneshwar English Medium School) मधील चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तर एन.डी.ए. (N.D.A.) मध्ये चोरी झाल्याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अशोक तांदळे याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशी एनडीए मधून चोरलेले चंदनाचे झाडाचे खोड त्याच्या साथिदारांनी विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. तसेच हे खोड करडे याला विकल्याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिस करडे याचा शोध घेत होते मात्र तो सापडला नाही. त्याच्या घराची झडती घेतली असता करडे याची पत्नी उषा करडे हिच्या ताब्यातून 85 किलो वजनाचे चंदनाचे लाकूड आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा जप्त करुन उत्तमनगर पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला. दरम्य़ान चंदनाची चोरी करणारे पु.लं. देशपांडे उद्यानाजवळ (P.L. Deshpande Park) उभे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चंदनाचे झाड कापण्यासाठी लागणारे 3 वाकस, गिरमिट, कुऱ्हाड, रिकामी पोती असा मुद्देमाल जप्त केला.

 

तपासादरम्यान ही चंदनचोरी करणारी टोळी असून ते
चंदनाचे झाड कापून त्याचे खोड चोरी करुन त्याची विक्री करडे याला करत असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींकडून 10 किलो चंदनाचे लाकडू व एक करवत जप्त केली आहे.
आरोपींनी दत्तवाडी, डेक्कन (Deccan Police Station), बंडगार्डन (Bund Garden Police Station),
वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadi Police Station) हद्दीत चंदनाच्या झाडाची चोरी केल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी 6 गुन्हे उघडकीस आणून 3 लाख 91 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुढील तपास गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More),
पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप (PSI Gunga Jagtap), अजितकुमार पाटील (PSI Ajit Kumar Patil),
पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, शरद वाकसे, किरण पवार, सुजित पवार,
संजिव कळंबे, प्रकाश कटटे, प्रताप पडवाळ, राकेश टेकावडे, ज्ञानेश्वर चित्ते, दिपक क्षिरसागर, सतिश कत्रांळे,
गणेश शिंदे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch of ‘Pushpa Gang’, who stole sandalwood in Pune city, opened up 6 crimes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold-Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात आज पुन्हा झाला बदल, जाणून घ्या नवीन दर

 

Pune Crime | मोबाईल टॉवरच्या बीटीएस बॉक्समधून बेस बँड मशीनची चोरी करणारी टोळी गजाआड

 

Pune DPDC News | डीपीडीसीकडून आरोग्य सुविधांसाठी 12 कोटी 68 लाखांचा निधी