Pune Crime | वाहनचोरी करणारा अट्टल गुन्हेगार गुन्हे शाखेकडून गजाआड, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरात वाहन चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने (Anti-Robbery and Anti-Vehicle Theft Squad) बेड्या ठोकल्या आहेत. बच्चनसिंग जोगेंदरसिंग भोंड (Bachchan Singh Jogender Singh Bhond) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी (Pune Police) आरोपीकडून 2 लाख 95 हजार रुपये किमतीच्या दुचाकी (Two-Wheelers) आणि चारचाकी वाहने जप्त (Four-Wheelers Seized) केली असून 8 गुन्हे उघडकीस (Pune Crime) आणले आहेत.

 

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार रविवारी (दि.1 मे) वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadi Police Station) हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक शिवाजी जाधव (Police Naik Shivaji Jadhav) यांना माहिती मिळाली की, वैदवाडी जवळील रेल्वेच्या नवीन पुलालगत एक पगडी बांधलेला व्यक्ती काळ्या रंगाच्या अ‍ॅक्टिव्हा गाडीवर संशयीत रित्या थांबवला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून आरोपी बच्चनसिंग जोगेंदरसिंग भोंड (वय – 23 रा.बिराजदार नगर, हडपसर, पुणे) याला ताब्यात घेतले.(Pune Crime)

आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने पुणे आणि सोलापूर (Solapur) अशा वेगवेगळ्या ठिकाणावरुन वाहने चोरल्याची कबुली दिली. आरोपीकडून 2 लाख 95 हजार रुपये किमतीच्या 10 दुचाकी आणि 2 चारचाकी गाड्या जप्त करुन 8 गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीवर लोणीकंद (Lonikand Police Station), हडपसर (Hadapsar Police Station), मोहोळ (Mohol Police Station, Solapur Rural), शिवाजीनगर (Shivaji Nagar Police Station), वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून इतर 2 वाहनांबाबत तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर (Police Inspector Sunil Pandharkar), पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप (PSI Gunga Jagtap), पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश लोखंडे, विनायक रामाने, शाकिर खान, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे, सुदेश सपकाळ यांनी केलेली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Pune Crime seizes Rs 3 lakh worth of stolen vehicle

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा