Pune Crime | येरवडा परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांचा छापा; 8 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | येरवडा परिसरातील चालणाऱ्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर (Gambling Den In Yerwada) पोलिसांनी छापा मारुन 8 जणांना बेड्या ठोकल्या (Pune Crime) आहेत. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 5 हजार 700 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले. ही कारवाई सिद्धार्थनगर मच्छीमार्केटच्या पाठीमागे, कबूतर बिल्डींग येरवडा येथे गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाकडून (Social Security Cell Pune Police) करण्यात आली आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी शंकर शेट्टी Shankar Shetty (रा. ताडीवाला रोड, पुणे), अजय गायकवाड (Ajay Gaikwad), कुमार सोनवणे (Kumar Sonawane), रविंद्र भगत (Ravindra Bhagat), हरिचंद्र धोत्रे (Harichandra Dhotre), पांडुरंग लोखंडे (Pandurang Lokhande), विलास शिंदे (Vilas Shinde) (सर्व रा. येरवडा) विश्वनाथ सपकाळ (Vishwanath Sapkaal) (रा. चिंचवड) यांंच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम (Maharashtra Gambling Prohibition Act) कलम 12 (अ) नुसार येरवडा पोलिस ठाण्यात (Yerwada Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सिद्धार्थनगर मच्छीमार्केटच्या पाठीमागे, कबूतर बिल्डींग येरवडा येथे जुगार खेळत आणि इतरांना खेळवत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior PI Rajesh Puranik) यांना मिळाली. त्यानूसार 25 मार्च रोजी पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar) यांच्यासह सामाजिक सुरक्षा विभागाच्या (Pune Police Crime Branch SS Cell) पोलिस पथकाने छापा मारला. या कारवाईमध्ये जुगाऱ्यांना अटक करुन 5 हजार 700 रुपये रोख रक्कम तसेच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलिस सह – आयुक्त रविंद्र शिसवे (Joint CP Dr. Ravindra Shisve),
अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलिस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, पोलिस अंमलदार मनिषा पुकाळे (Manisha Pukale), बाबा कर्पे (Baba Karpe), आण्णा माने (Anna Mane), प्रमोद मोहिते (Pramod Mohite), हणमंत कांबळे (Hanmant Kamble), संदिप कोळगे (Sandeep Kolage), पुष्पेंद्र चव्हाण (Pushpendra Chavan), प्रताप कदम (Pratap Kadam) यांनी केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch raided gambling den in Yerwada area Action against 8 persons

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा