Pune Crime | पुण्यातील ‘एरिया 37 क्लब’वर पोलिसांचा छापा ! रमनलाल पोरवाल, सुभाष टेकवानी, किशोर जैन, राकेश कोंढेला जुगार खेळताना पकडलं; हॉटेल सुपरवायझर सुनिल मुंदडा, यतिन शहासह 6 जणांविरूध्द FIR, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बिबवेवाडी-कोंढवा रोडवरील (Bibvewadi Kondhwa Road) लुल्ला नगर (Lulla Nagar) येथील एरिया 37 क्लब (Area 37 Club) येथे सुरु असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर (Gambling Den) पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) छापा टाकून अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त करुन 6 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.23) बिबवेवाडी-कोंढवा रोडवरील (Bibvewadi Kondhwa Road) एरिया 37 क्लब येथे करण्यात आली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

रमनलाल सोगमलजी पोरवाल Ramanlal Sogmalji Porwal (रा. मार्केटयार्ड, पुणे), सुभाष दिपचंद टेकवानी Subhash Dipchand Tekwani (रा. भवानी पेठ, पुणे), किशोर मिठालाल जैन Kishore Mithalal Jain (रा. गंगाधाम चौक, पुणे), राकेश अरुण कोंढे (Rakesh Arun Kondhe) यांना तीन पत्त्यांचा जुगार खेळत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. तर जुगार खेळण्यासाठी हॉल उपलब्ध करुन देणाऱ्या हॉटेलचा सुपरवायझर (Hotel Supervisor) सुनिल हेमराज मुंदडा Sunil Hemraj Mundada (रा. रविवार पेठ), यतिन दिनेश शहा Yatin Dinesh Shah (रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा (Maharashtra Gambling Prevention Act) कलम 4(अ),5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime)

 

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला बिबवेवाडी-कोंढवा रोडवरील लुल्ला नगर येथील एरिया 37 क्लब येथे पैसे लावून तीन पत्ती जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एरिया 37 क्लब येथे छापा टकाला. या कारवाईत पोलिसांनी 87 हजार रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य, प्लास्टिक कॉईन्स, 1 लाख 36 हजार 440 रुपयांचे मोबाईल, 23 हजार 440 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 2 लाख 46 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik), पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके (PSI Shridhar Khadke), पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar) याच्यासह सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस अमंलदार यांनी केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch raided on Area 37 Club in Pune! Ramanlal Porwal, Subhash Tekwani, Kishor Jain, Rakesh Kondhe were caught gambling; FIR against 6 persons including Hotel Supervisor Sunil Mundada, Yatin Shah

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा; म्हणाले – ‘…पण दोन हात करायची वेळ आली तर कमी पडणार नाही’

 

Solapur Crime | करमाळ्यात नात्याला काळिमा फासणारी घटना! चुलत भावाने केले अल्पवयीन बहिणीशी लग्न

 

Pune Crime | कोंढव्यातील अट्टल गुन्हेगार नागपुर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची आजपर्यंत 62 जणांवर कारवाई