Pune Crime | फरासखाना परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेकडून छापा; 18 जणांवर FIR, 12 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | फरासखाना परिसरातील नवी बुधावर पेठेतील एका दुकानात सुरु असलेल्या जुगार अड्यावर (Gambling Den) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell, Pune) छापा टाकून 18 जणांवर गुन्हा दाखल करुन 12 जणांना अटक (Arrest) केली. पोलिसांनी (Pune Police) केलेल्या या कारवाईत रोख रक्कम तसेच जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये (Maharashtra Gambling Prevention Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे. ही कारवाई 30 जून रोजी करण्यात आली.

 

फरासखाना परिसरातील नवी बुधवार पेठेतील साई एंटरप्रायजेस नावाच्या दुकानात पैशांवर पणती पोकळी, सोरट जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला समजले. त्यानुसार पथकाने रात्री साडेसातच्या सुमारास छापा टाकून जुगार मालक व चालवणारे 5, खेळणारे 7 यांना ताब्यात घेतले. तर जागा मालक व इतर 5 जण पळून गेले. या कारवाईत 68 हजार 485 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

अटक करण्यात आलेले आरोपी
जुगार मालक अनिल निवृत्ती बांदर्गे (वय-52 रा. रविवार पेठ), वसीम जाफर शेख (वय-32 रा. पॉप्युलर होम, गणेश पेठ, पुणे)

 

जुगार घेणारे रायटर, कामगार
शुभम विजय शिंदे (वय-26 रा. भेकराईनगर, हडपसर), विशाल गिरीधर महाले (वय-19 रा. हिंदु कॉलनी, रविवार पेठ), इरफान सईद खान (वय-35 रा. रविवार पेठ)

जुगार खेळणारे खेळी
अमरदीप नागनाथ कांबळे (वय-40 रा. श्रमिक नगर, विश्रांतवाडी), हरीष कुट्टी कुमार (वय-35 रा. डांबर गल्ली, बुधवार पेठ), राजेश विठ्ठल चव्हाण (वय-40 रा. रविवार पेठ), अकिल जमिल शेख (वय-23 रा. चक्रपाणी झोपडपट्टी, भोसरी), छोटु बाळकृष्ण नेरकर (वय-52 रा. अंबासन, ता. सटाणा, जि. नाशिक), राजु जगन्नाथ सिजवी (वय-35 रा. बुधवार पेठ), मनोज राममिलन चौरासिया (वय-31 रा. बुधवार पेठ) तर जुगार अड्डा मालक एन.एम. गनबोटे आणि इतर 5 जण फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik),
पोलीस अंमलदार मोहिते, शिंदे, इरफान पठाण, हनमंत कांबळे यांच्या पथकाने केली.
तसेच परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक यांच्या पथकाने केली

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch raids gambling den in Faraskhana area; FIR against 18 persons, arrest of 12 persons

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP MLA Ashish Shelar | CM एकनाथ शिंदेंनी सांभाळलेल्या नगरविकास खात्याविरोधात आशिष शेलार यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका; जाणून घ्या प्रकरण

 

Maharashtra Rains | खुशखबर ! राज्यात पाऊस सक्रिय ! 7 जुलैपासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता – IMD

 

Pune News | दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; ‘द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन’ व ‘सेवा सहयोग संस्थे’चा उपक्रम