Pune Crime | कोंढवा येथील लॅविटेट आणि द ब्रेक रुम हॉटेलमधील हुक्का बारवर गुन्हे शाखेचा छापा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोंढवा येथील क्लोव्हर हिल प्लाझा (Clover Hill Plaza Kondhwa) इमारतीत असलेल्या दोन हॉटेलमधील अवैध हुक्का बारवर (Hookah Bar) गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) करुन दोन जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.1) लॅविटेट हॉटेल (Lavitate Hotel) व द ब्रेक रूम हॉटेल (The Break Room Hotel) येथे करण्यात आली.

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना कोंढवा येथील लॅविटेट हॉटेल व द ब्रेक रुम हॉटेल मध्ये अवैध हुक्का बार सुरु असल्याची माहिती मिळाली. पथकाने पाळत ठेवून दोन्ही हॉटेलवर छापा टाकला असता त्याठिकाणी बेकायदेशीरपणे हुक्का बार सुरु असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन्ही ठिकाणावरुन वेगवेगळ्या कंपनीचे हुक्क्याचे फ्लेवर व हुक्क्याचे साहित्य असा एकूण 65 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोन जणांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांना पुढील कारवाईसाठी कोंढवा पोलिसांच्या ताब्यात (Pune Crime) देण्यात आले आहे.

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.

Web Title :-  Pune Crime | Pune Police Crime Branch raids hookah bars at Lavitate and The Break Room Hotel in Kondhwa

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Arvind Sawant | अरविंद सावंतांची शिंदे गटातील आमदारांवर जबरी टीका, म्हणाले – ‘या 40 आमदारांना गाडण्यासाठी…’

Qala Movie | बहुचर्चित काला चित्रपटाची रिलीज डेट जाहिर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Balasaheb Thorat | काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होणार?, बाळासाहेब थोरात म्हणाले…