Pune Crime | मसाज सेंटरच्या नावाखाली भलतेच उद्योग सुरू ठेवणारा स्पा सेंटरचा मालक मनिष मुथा ‘गोत्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मसाज सेंटरच्या (Massage Center) नावाखाली वेश्याव्यवसाय (Prostitution) करुन घेणाऱ्या स्पा मालकाला (Spa Center Owner) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) समाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell, Pune) अटक (Arrest) केली आहे. मनिष सुरेशचंद मुथा (Manish Sureshchand Mutha) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला (Pune Crime) होता. या गुन्ह्यात पोलीस मुथाचा शोध घेत होते.

 

मनिष सुरेशचंद मुथा (वय-40 रा. ए-1003 ईशापर्ल ससायटी, कुमार पृथ्वीच्या मागे, कोंढवा खुर्द-Kondhwa Khurd) याचे औरा स्पा सलूनचा (Aura Spa Pune) भागीदारीत व्यवसाय आहे. या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी कारवाई केली होती. तर मनिष मुथा याच्यावर गुन्हा दाखल केला होता. मुथा हा एका गुन्ह्यामध्ये येरवडा कारागृहात (Yerwada Jail) असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना समजली. (Pune Crime)

 

आरोपीला चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार अटक करायची असल्याने
प्रथम न्यायदंडाधिकारी (First Magistrate) यांच्याकडून आरोपी वर्ग करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आरोपीला येरवडा जेल येथून ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik),
पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar), महिला पोलीस हवालदार राजश्री मोहिते, पोलीस नाईक इरफान पठाण यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Social Security Cell arrest Manish Sureshchandra Mutha, owner of Spa Center Chaturshrungi Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Municipal Corporation (PMC) | व्यावसायिक मिळकतींना ‘मिटर’द्वारे पाणी पुरवठा होतोय की नाही? सर्वेक्षण करून तातडीने मिटर बसविणार – पुणे महापालिका

Kirit Somaiya Attack Case | किरीट सोमय्यांवर हल्ला प्रकरणी शिवसेना नेत्याला मुंबई पोलिसांकडून अटक

Pune Crime | IPL सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या परेश भूत, प्रफुल्ल कलावटे, अक्षय ठोंबरे आणि महेश क्षिरसागरला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक