Pune Crime | गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचा स्वारगेट परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा, 6 जण ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | स्वारगेट पोलीस ठाण्याच्या (Swargate Police Station) हद्दीत सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell, Pune) छापा टाकून 18 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 6 जणांना ताब्यात (Pune Crime) घेतले. ही कारवाई सोमवारी (दि.18) जुनी सोनिया गांधी झोपडपट्टी (Old Sonia Gandhi Slum) येथील नाल्याच्या कडलेला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली.

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला जुनी सोनिया गांधी झोपडपट्टी येथील नाल्यालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये 52 पत्त्यांचा बेकायदेशीर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याठिकाणी छापा टाकून प्रशांत शामसुंदर गुप्ता Prashant Shamsunder Gupta (वय-46 रा. बालाजी नगर, पुणे), निजामुद्दीन हसन शेख Nizamuddin Hasan Sheikh (वय-41 रा. घोरपडी पेठ, पुणे), नितीन हिंदुराव लोंडे Nitin Hindurao Londe (वय-42 रा. गुलटेकडी, पुणे), दिपक दिनेश्वर मंडल Deepak Dineshwar Mandal (वय-31 रा. बालाजी नगर, पुणे), कृष्णा गोविंदा लाकडे Krishna Govinda Lakde (वय-31 रा. वैदवाडी, हडपसर), रामदास संपत बारी Ramdas Sampat Bari (वय-63 रा. टेल्को चौक, पुणे) यांना ताब्यात घेऊन यांच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा (Maharashtra Gambling Prevention Act) कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

या गुन्ह्यातील शकील शेख (Shakeel Shaikh) व प्रशांत पाटील (Prashant Patil) हे दोघे फरार झाले आहेत. सामाजिक सुरक्षा विभागाने स्वारगेट पोलीस ठाण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल केला असून 6 जणांना पुढील कारवाईसाठी स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे
(Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik),
पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत,
बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, प्रमोद मोहिते, आण्णा माने, हनमंत कांबळे, इरफान पठाण, संदीप कोळगे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Social Security Cell raids gambling den in Swargate area, arrests 6


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून खडकी परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा, 9 जण ताब्यात

MNS | मनसेची आणखी एक मोठी घोषणा ! अक्षय्य तृतीयेला लाऊडस्पीकर…

Pune PMC Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार; शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा