Pune Crime | सामाजिक सुरक्षा विभागाकडून बिबवेवाडीत गावठी दारुच्या अड्ड्यावर छापा, महिलेसह 3 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गावठी दारूच्या अड्ड्यावर (Village Liquor Den) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) छापा (Raid) टाकून तिन जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन दोघांना अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या (Bibwewadi Police Station) हद्दीतील झांबरे वस्ती (Zambare Vasti) येथे गुरुवारी (दि. 19) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी (Pune Police) 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला आहे.

शारदा किसन सोनावणे Sharda Kisan Sonawane (वय-60 रा. झांबरे वस्ती, बिबवेवाडी), अनिल यशवंत गुप्ते Anil Yashwant Gupte (वय-28), विजय सिताराम कट्टीमनी Vijay Sitaram Kattimani (वय-24 दोघे रा. जगताप डेअरीच्या मागे, बिबवेवाडी कोंढवा रोड, पुणे) यांच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आयपीसी 65 ई, महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत (Maharashtra Prohibition Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून शारदा सोनावणे या महिलेला नोटीस देण्यात आली आहे. तर अनिल गुप्ते आणि विजय कट्टीमनी यांना अटक केली आहे.(Pune Crime)

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या ह्द्दीतील झांबरे वस्ती येथे विक्रीसाठी, गावठी दारुचा साठा करुन ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून 39 हजार 850 रुपये किंमतीची 998.5 लिटर गावठी हातभट्टीची दारु व रोख रक्कम 830 असा एकूण 40 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik), पोलीस उप निरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar), पोलीस अंमलदार बाबा कर्पे, राजश्री मोहिते, इरफान पठाण, हनमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : Pune Crime | Pune Police Crime Branch Social Security Cell raids liquor den
in Bibwewadi, FIR against 3 persons including a woman

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त