Pune Crime | 104 पेक्षा अधिक घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार गुन्हे शाखेच्या जाळ्यात, 5 लाखांचे 102 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime | घरफोडीच्या गुन्ह्यातील (Burglary Case) आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने पुणे परिसरात तब्बल 104 पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे केले असून तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार (Pune Crime) आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 5 लाख रुपये किमतीचे 102 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) जप्त केले आहेत.

जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड Jaywant alias Jayadya Govardhan Gaikwad (वय-34 रा. आंबेडकर वसाहत, डिपी. रोड औंध-Aundh) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने 10 मार्च 2021 रोजी कात्रज (Katraj) येथील प्रदीप स्वामी (Pradeep Swamy) आणि सतीश करंदीकर (Satish Karandikar) यांच्या बंद घराचे कडी कोयंडे तोडून घरातील 2 लाख 90 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरले (Stole Silver Jewelry) होते. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. (Pune Crime)

घरफोडी, चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना कात्रज येथे एक वर्षापूर्वी जयवंत गायकवाड याने घरफोडी केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता आरोपी येरवडा मध्यवर्ती कारागृहात (Yerwada Central Jail) असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (First Class Magistrate) कोर्ट नं.4 यांच्या आदेशाने आरोपीला येरवडा कारागृहातून ताब्यात घेऊन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेतली.

आरोपीकडे चौकशी केली असता त्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने कात्रज येथील घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याने पुणे आणि भुगाव (Bhugaon) परिसरात घरफोडी केल्याची माहिती दिली. तसेच चोरलेले सोन्याचे व चांदीचे दागिने वेगवेगळ्या ठिकाणी गहाण ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली.

आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे युनिट दोनच्या पथकाने आरोपीला घेऊन पुणे शहर, देहु रोड (Dehu Road), श्रीरामपूर (Shrirampur), सोलापूर (Solapur) या भागात जाऊन त्याने गहाण ठेवलेले दागिने जप्त केले. पोलिसांनी 5 लाख 300 रुपये किमतीचे 102 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले. आरोपीकडून भारती विद्यापीठ, सिंहगड रोड (Sinhagad Road Police Station) आणि पौड पोलीस ठाण्यातील (Paud Police Station) प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे.

आरोपीवर 104 पेक्षा अधिक गुन्हे

अटक करण्यात आलेला आरोपी अट्टल चोर असून तो पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापुर्वी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Commissionerate) अभिलेखावर 104 पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखालीपोलीस पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Krantikumar Patil),
पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad),
पोलीस अंमलदार यशवंत आंब्रे, अस्लम पठाण, गजानन सोनुने, कादीर शेख,
समीर पटेल, नागनाथ राख, संजय जाधव, निखील जाधव साधना ताम्हाणे यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | Pune Police Crime Branch solve More than 104 burglars

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

 

Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत ‘डिजिटल कार्यकर्त्यां’मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर