Pune Crime | पेट्रोल व डिझेल चोरी करणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 81 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पेट्रोल (Petrol) व डिझेल (Diesel) टँकरमधून इंधनाची चोरी (Fuel Theft) करुन त्याची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीवर (Gang) गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (Pune Police Crime Branch Social Security Cell) कारवाई केली आहे. 10 आरोपीविरुद्ध कारवाई करुन 81 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीतील आळंदी मातोबाची रस्त्यावरील मारुती कुंजीर यांच्या शेतात (Pune Crime) सोमवारी (दि. 4) करण्यात आली.

 

सामाजिक सुरक्षा विभागाला टँकर मधून पेट्रोल व डिझेल चोरी करणाऱ्या टोळीच्या अवैध धंद्याबाबत माहिती मिळाली की, वळती आळंदी मातोबाची रस्त्यावरील मारुती कुंजीर यांच्या शेतामध्ये पडद्यामागे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (Bharat Petroleum Corporation Ltd.) या डेपो मधून पेट्रोल व डिझेल भरलेला टँकर मधून पेट्रोल व डिझेल काढून त्याची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून 5 जणांना पीसीएलचा टँकर (PCL Tanker) बेकायदेशीर मार्गावर नेऊन त्याचे सील तोडून त्यातील इंधनाची चोरी करताना रंगेहात पकडले. (Pune Crime)

 

या कारवाईत रॅकेट चालवणारा बालाजी मधुकर बजबळकर Balaji Madhukar Bajbalkar (वय – 41), दत्तात्रय गजेंद्र बजबळकर Dattatraya Gajendra Bajbalkar (वय – 41 दोघे रा. माळवाडी, हडपसर), टँकरमधून पेट्रोल-डिझेल चोरणारा उत्तम विजय गायकवाड Uttam Vijay Gaikwad (वय – 31 रा. मुपो. तरड, ता. हवेली), टँकर मालक अजिंक्य मारुती शिरसाठ Tanker Owner Ajinkya Maruti Shirsath (वय – 26 रा. कदम वस्ती शाळेच्या मागे, लोणी काळभोर), बीपीसीएल कंपनीतून भरलेला टँकर आणणारा टँकर ट्रान्सपोर्ट मॅनेजर साहिल दिलीप तुपे Tanker Transport Manager Sahil Dilip Tupe (वय – 22 रा. कुंजीरवाडी, लोणी काळभोर) यांना अटक केली आहे.

तर ट्रान्सपोर्टचा मालक रोशन कुंजीर Transport owner Roshan Kunjir (रा. कुंजीरवाडी),
राहुल कुंजीर Rahul Kunjir (रा. कुंजीरवाडी)
जागा मालक मारुती नामदेव कुंजीर Land owner Maruti Namdev Kunjir (वय – 59 रा. वळती, ता. हवेली),
V.T.S. वेंडर (लॉक) प्रणालीचे पुणे एरिया सुपरवायझर (V.T.S. Vendor (Lock ) Pune Area Supervisor),
भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड कंपनीचे ज्ञात व अज्ञात अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

पोलिसांनी या कारवाईत 81 लाख 4 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यामध्ये रोख रक्कम 2500 तसेच 25 हजार 500 रुपयांचे 6 मोबाईल,
80 लाख रुपये किमतीचा एक इंधनाने भरलेला भारत पेट्रोलियम कंपनीचा टँकर (एमएच 12 एस एक्स 2559), 5700 रुपयाचे डिझेलने भरलेले तीन कॅन, 65 हजार रुपयांच्या 3 दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik),
पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar),
महिला पोलीस अंमलदार राजश्री मोहिते, निलम शिंदे, पोलीस अंमलदार इरफान पठाण, हणमंत कांबळे यांच्या पथकाने केली आहे.
पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे आदेशानुसार या कारवाईसाठी परीविक्षाधिन पोलीस उप निरीक्षकांनी देखील आपला सहभाग नोंदवला.

 

 

Web Title :- Pune Crime | pune police crime branch ss cell open Petrol and diesel theft gang seizes Rs 81 lakh

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा