Pune Crime | पुणे गुन्हे शाखेकडून कात्रज परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा, 10 जण ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Pune Police SS Cell) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharti Vidyapeeth Police Station) हद्दीत सुरु असलेल्या कल्याण मटका (Kalyan Matka) जुगार अड्ड्यावर (Gambling Den) छापा टाकून 10 जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई कात्रज येथील आनंद दरबार ट्रस्ट समोरील पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

कात्रज (Katraj) येथील आनंदर दरबार ट्रस्टच्या समोर पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला (Pune Police) मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवून छापा टाकला. त्यावेळी कल्याण मटका जुगार व पंती पाकोळी सोरट जुगार घेत असताना व खेळताना 10 जण आढळून आले. पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 25,050 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Senior Police Inspector Arvind Mane),
पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके (PSI Sridhar Khadke), पोलीस अंमलदार बाबा कर्पे, प्रमोद मोहिते, इरफान पठाण,
हणमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण, प्रफुल्ल गायकवाड यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell raids gambling den in Katraj area, 10 arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 302 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 867 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune NCP | पुणे महानगरपालिकेतील विविध प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या विरोधात राष्ट्रवादीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार