Pune Crime | पुण्यात जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेकडून छापा, 12 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बुधवार पेठेतील (Budhwar Peth) एका इमारतीत सुरु असलेल्या जुगार अड्यावर (Gambling Den) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell, Pune) छापा टाकून 12 जणांना अटक (Arrest) केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत रोख रक्कम तसेच जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये (Maharashtra Gambling Prevention Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

या प्रकरणी अतुल अरुण उमापती (Atul Arun Umapati), सुहास संतोष दाकले (Suhas Santosh Dakle), महादेव गौतम डोकेफोडे (Mahadev Gautam Dokefode), भोलेनाथ राजू बनसोडे (Bholenath Raju Bansode), इंद्रजीत विनोद पाटील (Inderjit Vinod Patil), निखिल मारुती मारणे (Nikhil Maruti Marane), परशुराम चर्मकानी नाडर (Parshuram Charmakani Nadar), तुकाराम तानाजी मारणे (Tukaram Tanaji Marane), मंदार बंडोपंत काळे (Mandar Bandopant Kale), तुषार मिलिंद बहुले (Tushar Milind Bahule), निखिल नंदकुमार क्षीरसागर (Nikhil Nandkumar Kshirsagar), ऋषिकेश दत्तात्रय जाधव (Rishikesh Dattatraya Jadhav यांना अटक केली आहे. (Pune Crime)

बुधवार पेठेतील क्रांती हॉटेलजवळील एका इमारतीमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी जुगार अड्ड्याचा मालक तसेच जुगार खेळण्यासाठी आलेल्या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 77 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik),
पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके (PSI Sridhar Khadke), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत,
निलम शिंदे, प्रमोद मोहिते, इरफान पठाण, अश्विनी केकाण यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell raids gambling den in Pune, arrests 12

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा