Pune Crime | ताडीवाला रोडवरील डनी शेट, विक्रम जाधवच्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाची धाड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ताडीवाला रोड (Tadiwala Road) येथे डनी शेट (Danny Shet) व विक्रम जाधव (Vikram Jadhav) यांच्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) सामाजिक सुरक्षा विभागाने (Pune Police Crime Branch Social Security Cell) छापा टाकून पाच जणांना अटक (Arrest) केली. अंकुश (रा. दौंड), डनी ऊर्फ विठ्ठल देशमुख (रा. उल्हासनगर, ठाणे) आणि विक्रम जाधव (रा. येरवडा) हे मटका जुगार अड्डा (Pune Crime) चालवित होते.

 

सामाजिक सुरक्षा विभागाने शहरातील मटका जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला (Police Control Room) दररोज जुगार अड्डे, दारु विक्रीसाठी अनेक फोन येत असतात. पण, स्थानिक पोलिसांना (Local Police) तेथे काहीही सुरु असल्याचे आढळून येत नाही. गुरुवारी दिवसभरात पोलीस नियंत्रण कक्षाला शहराच्या वेगवेगळ्या भागात 10 ठिकाणी जुगार, दारु विक्री सुरु असल्याची माहिती नागरिकांनी दिली होती. पोलीस नियंत्रण कक्षाने संबंधित स्थानिक पोलीस ठाण्याला कारवाई करण्यास सांगितले. परंतु, एकाही ठिकाणी दारु विक्री अथवा जुगार अड्डा सुरु असल्याचे पोलीस ठाण्याच्या पथकाला आढळून आले नाही. त्याचवेळी सामाजिक सुरक्षा विभागाला मात्र असे अड्डे आढळून येत असून त्यांच्याकडून दररोज कारवाई सुरु आहे. जे सामाजिक सुरक्षा विभागाला दिसते, ते स्थानिक पोलीस ठाण्यांना का दिसत नाही, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी पोलीस शिपाई संदीप कोळगे (Police Constable Sandeep Kolage) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मधुकर औरंगे Madhukar Orange (वय 54, रा. लक्ष्मीनगर), गणेश मलेकर Ganesh Malekar (वय 53, रा. राम सोसायटी, चंदननगर), राम कारभारी शिंदे Ram Karbhari Shinde (वय 54, रा. कासारवाडी), यासिन तडवी Yasin Tadvi (वय 63, रा. मांजरी बुद्रुक), लक्ष्मण सुरवसे Laxman Suravase (वय 60, रा. दापोडी) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 हजार 660 रुपये रोख, 3 मोबाईल तसेच जुगाराचे साहित्य असा 10 हजार 160 रुपयांचा माल जप्त केला आहे. डनी ऊर्फ विठ्ठल देशमुख, विक्रम जाधव (रा. येरवडा) अंकुश (रा. दौंड) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Police Inspector Rajesh Puranik) यांना मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक सौरभ हॉल चौकात गेले.
तेथून पुढे जाऊन त्यांनी पाहणी केली असता एका पत्र्याच्या शेडमध्ये एक जण हातात पावती पुस्तक घेऊन पेनाने काहीतरी लिहित होता.
त्याचे समोर काही जण हातात पैसे घेऊन उभे होते. पोलिसांना पाहून काही जण पळून गेले.
पोलिसांनी जुगार घेणारे 2 आणि खेळणारे 3 अशा 5 जणांना पकडले.
बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell Raids On Gambling Den On Tadiwala Road Bundgarden Police Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा