क्राईम स्टोरीपुणे

Pune Crime | कोरेगाव पार्कमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; दोघांना अटक, 8 तरुणींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोरेगाव पार्कमधील (Koregaon Park, Pune) आलिशान सोसायटीत मसाज पार्लरच्या (Massage Parlour In Koregaon Park) नावाखाली वेश्या व्यवसाय (Prostitution) सुरु असल्याचे गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell, Pune) उघडकीस आणले आहे. दोघांना अटक करुन ८ तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

 

याप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५६/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी किरण चंद्रकांत कोळी (वय २९, रा. नेहरुनगर, पिंपरी) आणि महंमद इंजामुल हुसेन (वय १९, रा. कोरेगाव पार्क) या दोघांना अटक केली आहे. मुकुल घुले, अनुज कुमार, राकेश पांडे, अब्दुल बतेने, सोनबा निगडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रोडवर (North Main Road, Koregaon Park, Pune) लिबर्टी सोसायटीत दुसर्‍या मजल्यावर ली ब्युटी स्पा हे मसाज सेंटर आहे. याठिकाणी जादा पैसे घेऊन वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविला. त्यांनी इशारा करताच पोलिसांनी तेथे छापा घातला (Pune Police Crime Branch SS Cell Raids On Massage Parlour In Koregaon Park Area). त्यात मसाज सेंटरवरील दोघांना अटक करुन ८ तरुणींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ८८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell Raids On Massage Parlour In Koregaon Park Area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Back to top button