Pune Crime | शिवाजीनगर येथे एकाच वेळी 6 ऑनलाईन जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेकडून छापे; 4.55 लाखाचा मुद्देमाल जप्त, 55 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मागील काही दिवसापासून पुणे गुन्हे शाखेकडून (Pune Police Crime Branch) अवैध मटका अड्ड्यावर (Illegal Gambling Den) कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या (Shivaji Nagar Police Station) हद्दीत सुरु असलेल्या अवैध ऑनलाईन मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांनी एकाचवेळी सहा ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापे (Raids On Online Gambling Den) टाकून सुमारे 4 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 55 जणांवर कारवाई केली. ही कारवाई काल (सोमवार) सायंकाळी चारच्या सुमारास (Pune Crime) करण्यात आली.

 

सोमवारी सायंकाळी सुमारास अवैध मटक्याच्या ऑनलाईन धंद्या बाबत मिळालेल्या बातमीनुसार, शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पुणे महापालिकेजवळ Pune Municipal Corporation (PMC) असलेल्या मंगला टॉकीज चौक, शिवाजी नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील, रामसर बेकरी कॉर्नर शेजारच्या अनुक्रमे स्वस्तिक लॉटरी सेंटर, स्टार लॉटरी सेंटर, सवेरा लॉटरी सेंटर, साई प्रतिक लॉटरी सेंटर, शहा लॉटरी सेंटर, जीपीएस लॉटरी सेंटर अशा एकूण सहा दुकानात सुरू असलेल्या ऑनलाइन मटका व इतर प्रकारचे जुगार, पैशावर गैर कायदेशीररीत्या खेळत व खेळवत असल्याची माहिती मिळाली. (Pune Crime)

त्यानुसार पंच, बनावट ग्राहक व पोलीस पथकासह चारच्या सुमारास छापा टाकून मोबाईल व संगणकाचा वापर करुन ऑनलाईन मटका व इतर जुगार वगैरे खेळणारे, खेळवणारे व पाहीजे आरोपी असे एकुण 55 इसमांविरुद्ध आयपीसी 420, सह कलम 120 (ब), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा (Maharashtra Gambling Prevention Act) कलम 4(अ) व 5 तसेच इन्फार्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट (Information Technology Act) कलम 66 (सी) व (डी) अन्वये शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

अटक/कारवाई केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

दुकान क्रमांक -1

स्वस्तिक लाॅटरी सेंटर येथील ऑनलाईन मटका व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स, खेळी अशा आरोपींची नावे

1. अब्दुल रशीद हबीब मोहम्मद मेमन (वय- 52 वर्षे, धंदा – ऑनलाईन लॉटरी मालक, रा. शिवाजीनगर, तोफखाना २१/२३, पुणे)

2. विजय श्रीरंग बनकर (वय 52 वर्षे, धंदा – जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा. ठी. २२५ शिवाजीनगर गावठाण, पुणे)

3. राजेंद्र हरिभाऊ माने (वय-53 वर्षे, धंदा – नोकरी, रा. ठी. सर्वे नंबर ७, तळजाई पठार, धनकवडी, पुणे)

4. सतीश किसन बोगार (वय – 48 वर्षे, धंदा – फॅब्रिकेशन, रा.ठी. साठे वस्ती, महादेव मंदिराजवळ, चाळ नंबर ४, घर नंबर ४, लोहगाव, पुणे)

5. सतीश किसन बोगार (वय – ३० वर्षे, धंदा – स्विगी डिलिव्हरी बॉय, रा. ठी. दीप बंगला चौक, महाले नगर, म्हसोबा मंदिर समोर, वडारवाडी, पुणे)

6. बच्चेलाल भगवती गौड (वय – ४८ वर्षे, धंदा नोकरी, रा. ठी. मस्तानी आईस्क्रीमसमोरची बिल्डिंग, बुधवार पेठ, पुणे)

7. श्रावणसिंग दौलतसिंग नाथावत (वय- 40 वर्षे, धंदा- नोकरी, रा.ठी. सभा भवनसमोर, रोहित लॉटरी, बुधवार पेठ, पुणे)

8. संदीप यशवंत राजपूत (वय 39 वर्षे, धंदा – नोकरी, रा. ठी. शिवनगर, तापकीर चाळ, सुतारवाडी, पुणे)

दुकान क्रमांक – 2

स्टार लॉटरी सेंटर येथील ऑनलाईन मटका व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स, खेळी यांची नांवे.

9. प्रविण गुलाबराव शेळके (वय-52 वर्षे, धंदा – जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा. ठी. सर्व्हे नंबर २२/६६, प्रितम हाईट्स, बालाजीनगर, धनकवडी, पुणे)

10. रियाज बादशा हणुरे (वय 38 वर्षे, धंदा जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा. ठी. सर्व्हे नंबर ४२७, गुलटेकडी, इंदिरानगर, पुणे)

11. रफिक अहमद शेख (वय- 40 वर्षे, धंदा जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा. ठी. गोसावी वस्ती, वैधवाडी, हडपसर, पुणे)

12. बाळासाहेब गणेश जेधे (वय-35, धंदा -जुगार मालक, रा.ठी. स.नं ३८२, बरके आळी, सोमवार पेठ, पुणे)

13. मंगेश आबासाहेब शितोळे (वय-34 वर्षे, जुगार खेळणारा, रा. शितोळे बिल्डींग, जुनी सांगवी शेवट बस स्टॉप, पिंपरी चिंचवड, पुणे)

14. किसन प्रकाश तेलोरे (वय-३८ वर्षै, धंदा जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा.ठी. स.नं.१३/१४, पुष्पक गॅस गोडाऊनचे मागे, बिबवेवाडी, पुणे)

15. अजय बाबुराव शिवमोरे (वय – 29 वर्षे, धंदा – जुगार खेळणारा, रा.ठी. शिवशंकर कॉलनी, थेरगांव, पिंपरी चिंचवड, पुणे)

दुकान क्रमांक -3

सवेरा लॉटरी सेंटर येथील ऑनलाईन मटका व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स व खेळी यांची नांवे.

16. राजेश प्रेमचंद यादव, वय – 35 वर्षे, धंदा – जुगार घेणारा मालक, रा. दुगदचाळ, संतोष नगर, कात्रज, पुणे)

17. दिपक मथुरावाला ओझा (वय – 21 वर्षे, धंदा – जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा. ठी. ३०९, सोमवार पेठ, जोशीवाडा, पुणे)

18. किशोर गणपती नगराळे (वय-30 वर्षे, धंदा – जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा. ठी. आयान हॉस्टेल, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे)

19. विजय रामफल भिल्लोड (वय – 46 वर्षे, धंदा – जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा. ठी. फारशी चाळ, देहूरोड रेल्वे स्टेशन, पुणे)

20. सुरेश गणपत गारडे (वय-54 वर्षे, धंदा – जुगार मालक, रा. गणेश नगर, पोकळे चाळ, धायरी, पुणे)

21. राहुल प्रकाश जगधने (वय- 34 वर्षे, धंदा जुगार खेळणारा, रा. ठी. शितोळे बिल्डींग, २३८९, न्यू मोदीखाना, पूना कॉलेज समोर, कॅम्प, पुणे)

22. बापू कारभारी भोसले (वय ५२ वर्षे, धंदा – जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा.ठी. सोमेश्वरवाडी, दळवी वीट भट्टी, औंध, पाषाण, पुणे)

23. सुभाष श्रावण देवरे (वय – ४३ वर्षे, धंदा – जुगार खेळणारा, रा. ठी. अमृततुल्य हॉटेलचे मागे, पाटील इस्टेट, पुणे‌)

24. गणेश विजयसिंग परदेशी (वय – ४५ वर्षे, धंदा – जुगार घेणारा, रा.ठी. ओमकार कॉलनी, विजय नगर, काळेवाडी, पिंपरी, पुणे)

25. गोपाळ कुमार पारेकर (वय – २२ वर्षे, धंदा – जुगार घेणारा, कामगार/ रायटर, रा.ठी. ग्रीनफिल्ड सोसायटी, ए वींग, दुसरा मजला, साई मंदिर, कात्रज पुणे)

दुकान क्रमांक – 4

साई प्रतिक लॉटरी सेंटर येथील ऑनलाईन मटका व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स व खेळी यांची नांवे.

26. नितीन विठ्ठल डोंगरे (वय – ५२ वर्षे, धंदा – जुगार मालक, रा.ठी. नागपूर चाळ, सर्व्हे नंबर १९१, अशोक जनरल स्टोअरचे शेजारी, येरवडा, पुणे)

27. महेंद्र बाबू बेरी (वय ३२ वर्षे, धंदा – रायटर, रा. ठी. सर्व्हे नंबर १०, पर्णकुटी, येरवडा, पुणे)

28. रामदास दत्तात्रय खैरे (वय – ५७ वर्षे, धंदा- ऑनलाईन मटका रायटर, रा. ठी. १०५६/५७, भवानी पेठ, पुणे)

29. सलीम रशीद शेख (वय-२५ वर्षे, धंदा – ऑनलाईन मटका रायटर, रा. ठी. ग्रीन हिल पार्क, कात्रज, पुणे)

30. दर्शन गोलूराम साहू (वय-४३ वर्षे, धंदा – गवंडी, रा. ठी. नांदेड फाटा, नाल्याशेजारी, पुणे)

31. सुशिल प्रेमानंद पवार (वय ४१ वर्षे, धंदा- नोकरी, जुगार खेळणारा, रा. ठी. ४३२, रास्ता पेठ, पुणे)

32. धनंजय बाळासाहेब कानगुडे (वय- ३२ वर्षे, धंदा – ड्रायव्हर, जुगार खेळणारा, रा.ठी. हिंजवडी फेज वन, साखरे वस्ती, विठ्ठल मंदिरा शेजारी, चिंतामणी निवास, बी – ६५, पुणे)

33. राजकुमार रामअजर सरोज (वय- २१ धंदा – कुक, जुगार खेळणारा, रा. ठी. बांबू हाऊस हॉटेल, शिवाजीनगर, पुणे)

34. प्रकाश सारंधर कंकाळ (वय – ५५ वर्षे, धंदा- हमाली, जुगार खेळणारा, रा. ठी. रहाटणी, रामनगर, पुणे)

35. राजेंद्र जगन्नाथ बेल्हेकर (वय-५३ वर्षे, धंदा- नोकरी व जुगार खेळणारा रा. ठी. नवी सांगवी, तालुका हवेली, जिल्हा पुणे)

36. विलास मरीबुवा सरजे (वय- ३१ वर्षे, धंदा- नोकरी, जुगार खेळणारा, रा. ठी‌. बालाजी नगर, भोसरी पुणे)

दुकान क्रमांक -6

जीपीएस लॉटरी सेंटर येथील ऑनलाईन मटका व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स व खेळी यांची नांवे

37. प्रवीण महादेव नगराळे (वय- ३१ वर्षे, धंदा – जीपीएस लॉटरी मालक, रा.ठी. शिक्षक सोसायटी, इंगोले नगर, पिंपळे निलख, पुणे)

38. सिद्धू दत्तू गायकवाड (वय ३७ वर्षे, धंदा जुगार घेणारा कामगार/ रायटर. रा.ठी. मनोभूषण अपार्टमेंट, फ्लॅट नंबर ०४, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड, पुणे)

घटनास्थळावरुन पळून गेलेले पाहीजे आरोपींची नावे

39. साई प्रतिक लॉटरी सेंटर, दुकान नंबर 4 चा मालक ज्ञानेश्वर बबन भगत (वय ५८ वर्षे, रा.ठी. मुंढवा, पुणे (पुर्ण पत्ता माहीत नाही)

40. शहा लॉटरी सेंटर, दुकान नंबर 5 चा मालक मनोज शहा, (पुर्ण पत्ता माहीत नाही)

41. rajwin.comshubhwin.com या ऑनलाईन लॉटरीचे मालक व बुकीज.

42 ते 55 दुकान नंबर 5 व 6 मधून पळून गेलेले एकुण 14 अनोळखी रायटर्स व खेळी, नांव व पत्ता माहित नाही.

 

कारवाई करण्यात आलेल्या आरोपींकडून (जुगार अड्डा मालक, रायटर, खेळी व पाहीजे असलेले अनोळखी इसम (पळून गेलेले ) असे एकुण 55 आरोपी) व घटनास्थळावरुन एकुण 4 लाख 55 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल (त्यामध्ये रोख 66,980 रुपये, तसेच 1,83,500 रुपये किंमतीचे 36 मोबाईल सेट्स व 2 लाख 5 हजार 100 रुपयांचे जुगाराचे साहित्य) जप्त करण्यात आले आहे.

शिवाजीनगर परिसरातील मंगला चित्रपट गृहासमोरील चौकात (पुणे महापालिका चौकात) रामसर बेकरी ते आलोक रेस्टॉरंट ॲंड बारचे दरम्यान असलेल्या व सध्या बंद पडलेल्या सिंध पंजाब हॉटेलच्या एकाच लाईनीतील एकुण सहा गाळ्यात स्वस्तिक लॉटरी सेंटर, स्टार लॉटरी सेंटर, सवेरा लॉटरी सेंटर, साई प्रतिक लॉटरी सेंटर, शहा लॉटरी सेंटर, जीपीएस लॉटरी सेंटर अशा वेगवेगळ्या नावाने सदरचा ऑनलाईन लॉटरीचे नावाखाली हे ऑनलाइन जुगार अड्डे सुरू करण्यात आलेले होते. सदर जुगाराचे अड्डे बाहेरुन बघीतले तर सर्व साधारण माणसाला ओळखू न येणारे असे आहेत.
या जुगार अड्ड्यांचे मुख्य प्रवेशद्वारावर जाड कापडाचे गडद रंगाचे मळके पडदे लावलेले असून, त्यामुळे आत लाईट सुरू असला अथवा कितीही गर्दी झाली तरीही, बाहेरच्या व्यक्तीस आतले काहीच दिसत नाही किंवा ऐकू येत नाही. या जुगार अड्ड्याच्या दुकानाबाहेर व आसपास या जुगार अड्ड्यावरचे शुटर्स (इंन्फॉर्मर्स) बसलेले असतात. ते बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीबाबत आतल्या व्यक्तीस मोबाईल वरून माहिती पुरवत असत. पोलीस येणार असल्याची माहिती मिळाल्यास सर्व जुगारींना मागच्या दाराने पळवून लावून, शेजारच्या दुकानातून दिलेला विद्युत पुरवठा खंडित केला जातो.‌ बाहेरच्या रस्त्यावर सतत प्रचंड वाहतूक असल्याने या जुगार अड्ड्याकडे खेळणारे सोडले तर इतरांचे‌ सहसा लक्ष जात नाही.

 

याठिकाणी ऑनलाईन ॲपद्वारे व पांढऱ्या प्लास्टिक पेपर शीटवर जुगार खेळण्यात येतो. खेळींनी लावलेला आकडा एका पांढऱ्या रंगाचे प्लास्टिक पेपरवर लिहला जातो. तो नंबर लक्षात ठेवण्यासाठी खेळी हा त्याचा मोबाईल मध्ये फोटो काढून घेतो. व काही क्षणातच या जुगाराचा ऑनलाईन निकाल लागतो. या ऑनलाईन जुगार प्रकारात जुगार अड्डा मालक, चालक, बुकीज, ॲपचा मालक व चालक यांनी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून, कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे न वापरता संगणकावर ऑनलाईन व्यवहार करुन शासन महसूल बुडवून, राज्य सरकारची (State Government) देखील फसवणूक (Fraud) केली असल्याचे निदर्शनास आले आहे.

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik), महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar), महिला पोलीस हवालदार मोहिते, शिंदे, पुकाळे, पोलीस हवालदार कुमावत, पोलीस नाईक‌ पोटे, पोलीस शिपाई भोसले, जमदाडे, पोलीस नाईक पठाण, कांबळे यांच्या पथकाने केली आहे. विशेष म्हणजे पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे आदेशानुसार सदर कारवाईत परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षकांचे एक पथकही सहभागी झाले होते.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell Raids On Online Gambling Den In Shivajinagar Area, Action On 55 People

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ramdas Kadam | रामदास कदमांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘उद्धव ठाकरे आजारी, अजितदादांनी डाव साधला’

 

Shivajirao Adhalarao Patil | ‘या’ कारणामुळं तिसऱ्या दिवशी माझी शिवसेनेतून हकालपट्टी केली’ – आढळराव पाटील (व्हिडीओ)

 

Anti Corruption Bureau (ACB) Sangli | 25 हजाराची लाच प्रकरणी 2 पोलीस एसीबीच्या जाळ्यात; सांगली पोलिस दलात खळबळ