Pune Crime | तडीपार सराईत गुन्हेगाराला पुण्याच्या गुन्हे शाखा युनिट-1 कडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातून (Pune Crime) दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असताना शहरात फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (Pune Criminals) गुन्हे शाखा युनिट एक (Pune Police Crime Branch) च्या पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. त्याच्याकडून एक रॅम्बो चाकु जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.24) पुण्यातील (Pune Crime) काशेवाडी (Kashewadi) येथील सार्वजनिक रोडवर करण्यात आली.

आबिद आलीम बागवान Abid Aleem Bagwan (वय-27 रा. 830 भवानी पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी खडक पोलीस ठाण्याच्या (Khadak police station) हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पुणे जिल्ह्यातून (Pune district) तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार काशेवाडी येथील सार्वजनिक रोडवर थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले. (Pune Crime)

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक हजार रुपये किमतीचा रॅम्बो चाकु आढळून आला. पोलिसांनी चाकू जप्त करुन त्याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट (Arm Act) अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर मारामारी, घरफोडी, चोरी असे 16 गुन्हे खडक, समर्थ (Samarth Police Station), स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) दाखल आहेत. त्याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहर आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Police Inspector Shailesh Sankhe), पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), पोलीस अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | Pune Police Crime Branch Unit-1 arrested criminals

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा