Pune Crime | बेकायदेशीर खासगी सावकारी करणाऱ्या आशिष पाटणे याच्यावर गुन्हे शाखा युनिट 5 कडून कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बेकायदेशीर 12 टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या सावकारावर (Money Lender) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाच ने (Pune Police Crime Branch) कारवाई केली आहे. आशिष संजय पाटणे Ashish Sanjay Patne (रा. येवलेवाडी, कोंढवा, पुणे) असे ताब्यात घेऊन गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या खासगी सावकाराचे नाव आहे. आरोपी आशिष पाटणे याने 8 लाखांच्या मोबदल्यात 22 लाखांची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. (Pune Crime)

 

जुबेर मेमन Zubair Memon (वय-32 रा. कोंढवा बु.) यांनी गुरुवारी (दि. 23) याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रारी अर्ज केला होता. गुन्हे शाखेने तक्रार अर्जाची चौकशी करुन आशिष पाटणे याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीकडून 8 लाख रुपये व्याजाने घेतले होते. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन (Corona Lockdown) करण्यात आल्याने फिर्यादी यांनी व्याजाची रक्कम (Interest) वेळेवर देऊ शकले नाही म्हणून आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली. तसेच 8 लाख मुद्दलाचा हिशोब करुन 22 लाख रुपयाची मागणी करुन धमकी दिली. आरोपी विरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Senior Police Inspector Hemant Patil), सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे (API Prasad Lonare), अमंलदार दया शेगर, महेश वाघमारे, विशाल भिलारे, आश्रुबा मोराळे, पृथ्वीराज पांडोळे, दाऊद सय्यद, विनोद शिवले, विलास खंदारे, अजय गायकवाड, संजयकुमार दळवी, स्नेहल जाधव, स्वाती गावडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Unit 5 arrest money lander Ashish Patne in kondhwa case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

बिहारमध्ये उंदरांचा नवीन ’कारनामा’, दारू आणि धरणानंतर आता X-Ray मशीनला केले टार्गेट, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 51 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | तडीपार सराईत गुन्हेगाराला पुण्याच्या गुन्हे शाखा युनिट-1 कडून अटक