Pune Crime | ‘गेम केल्याशिवाय चप्पल न घालण्याची शपथ’ ! पुण्याच्या डुक्कर खिंडीत बिल्डरवर गोळीबार करणार्‍याला करमाळ्यावरुन अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  Pune Crime | साथीदाराच्या खूनाचा बदला घेतल्याशिवाय पायात चप्पल न घालण्याची शपथ घेऊन बिल्डरवर गोळीबार (Firing on Builder) करुन खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील फरार गुन्हेगाराला खंडणी विरोधी पथकाने (anti extortion cell) सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा (Karmala) येथून अटक करण्यात (Pune Crime) आली आहे.

चेतन चंद्रकांत पवार Chetan Chandrakant Pawar (वय २७, रा. मेगा सिटी, एन एन डी टी कॉलेजजवळ, कर्वे रोड) असे या गुंडाचे नाव आहे.
खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे (Police Rajendra Landge), विवेक जाधव (Vivek Jadhav) यांना बांधकाम व्यावसायिकावर
गोळीबार करुन पळून गेलेला चेतन पवार हा करमाळा येथे असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस पथक करमाळा येथे रवाना झाले.
पांडे गावात सापळा लावून चेतन पवार याला पकडण्यात आले.
पुढील तपासासाठी त्याला वारजे पोलिसांच्या (Warje Malwadi Police Station)ताब्यात देण्यात आले आहे.

चेतन पवार याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न तसेच शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त रामनाथ पाकळे (Addl CP Ramnath Pokale),
उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shrinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ
(senior police inspector Vinayak Vetal) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा (API Sandeep Buwa), पोलीस अंमलदार नितीन कांबळे,
राजेंद्र लांडगे, विवेक जाधव, नितीन रावळ यांनी ही कामगिरी केली.
बांधकाम व्यवसायिक रवींद्र सखाराम तागुंदे (वय ३६) यांच्यावर चौघांनी डुक्करखिंडीत जूनमध्ये गोळीबार केला होता. सुदैवाने त्यात तागुंदे बचावले.

 

यातील संशयित आरोपी अभिजित येलवंडे (वय २४) याला अटक (Pune Crime) करण्यात आली आहे.
त्यांचे साथीदार नकुल खाडे, चेतन पवार, उमेश चिकणे हे पळून गेले होते.
तागुंदे व त्याच्या साथीदारांनी आरोपींचा मित्र दीपक सोनवणे याचा २०१३ मध्ये खून केला केला.
या खून प्रकरणात रवींद्र तागुंदे हा जामीनवर सुटला आहे.
दीपक याचा खून झाल्यानंतर नकुल खाडे याने या खूनाचा बदला घेतल्याशिवाय पायात चप्पल घालणार नसल्याची शपथ घेतली होती.
तेव्हापासून आरोपी रवींद्रच्या मागावर होते.
जामिनावर सुटल्यानंतर रवींद्रचा गेम (Pune Crime) करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

 

Web Title : Pune Crime | pune police crime branch’s anti extortion cell arrest criminal from karmala who abscond in firing on builder case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना या महिन्यात मिळू शकतात एकाचवेळी 3 गिफ्ट, ‘इथं’ जाणून घ्या नवीन अपडेट

IAS Manisha Patankar-Mhaiskar | ट्रेकिंगसाठी गेलेल्या महिला आयएएस अधिकाऱ्यावर मधमाशांचा हल्ला

Indian Navy Recruitment 2021 | 12 वी पास तरूणांसाठी इंडियन नेव्हीत 2500 पदांवर भरती, जाणून घ्या डिटेल्स