Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला लाखोंचा गंडा, आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांची नवी शक्कल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विवाह नोंदणी संकेतस्थाळावर (Matrimonial Site) ओळख झालेल्या पुण्यातील एका तरुणीला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार (Pune Crime) घडला आहे. या गुन्ह्यातील आरोपीला लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, आरोपीच्या मुसक्या (Arrest) आवळण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune City Police) अनोखी शक्कल लढली. पोलिसांनी इन्स्टाग्रामच्या (Instagram) मदतीने आरोपीला अटक केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राकेश कुमार हकींगसिंग चहर Rakesh Kumar Haking Singh Chahar (वय-36) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी मुळचा गोव्याचा (Goa) असून त्याचे लग्न झाले आहे. त्याने विवाह नोंदणी संकेतस्थळावर नाव नोंदणी केली. यानंतर त्याची ओळख फिर्यादी तरुणीसोबत झाली. आरोपीने काही दिवसांमध्ये तिच्यासोबत संबंध वाढवले. आरोपीने तरुणीला आईस्क्रीम व्यवसाय (Ice Cream Business) सुरु करायचे असल्याचे सांगून तरुणीकडे सात लाख रुपये मागितले. (Pune Crime)

तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवून आरोपीला सात लाख रुपये दिले. यानंतर तरुणीने त्याला फोन केला.
मात्र, त्याचे दोन्ही नंबर बंद होते. तरुणीला संशय आल्याने तिने दिलेले पैसे परत मागितले.
यावरुन आरोपीने तिला शिवीगाळ करुन मोबाईल बंद केला. फसवणूक (Cheating) झाल्याचे लक्षात आल्यानंतर
तिने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) धाव घेत आरोपी राकेश चहर याच्याविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन शोध सुरु केला.

पोलिसांनी राकेश चहर याला अटक करण्यासाठी इस्टाग्रामचा वापर केला. इन्स्टाग्रामवरुन त्याचा फोटो मिळवला.
मिळालेल्या फोटोमध्ये गॅलरीचा काही भाग दिसत होता. यावरुन पोलिसांनी आरोपीचा माग काढला आणि
त्याला पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | pune police crime instagram crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Gajanan Kirtikar | वडील शिंदेंकडे तर मुलगा उद्धव ठाकरेंकडे; उद्धव ठाकरे गटातून गजानन कीर्तिकर यांची हकालपट्टी

Pune Crime | अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर गुन्हे शाखेची कारवाई, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shivsena Sushama Andhare On BJP Chitra Wagh | ‘भाजपकडे गेलात की प्रकरण बंद, दुसरीकडे गेलात की सुरु…; राठोड प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ आणि भाजपला टोला