Pune Crime | घरफोडी करणारे 2 सराईत पुणे पोलिसांकडून गजाआड, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहर (Pune Crime) घरफोडी (Burglary) करणाऱ्या दोन अल्पवयीन सराईत गुन्हेगारांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 10 लाख 25 हजार रुपयांचे 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने (Gold jewelry) आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड, अ‍ॅपल फोन (Apple phone) असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते (ACP Kalyanrao Vidhate) यांनी दिली. हडपसर पोलिसांनी (Hadapsar police) ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) फुरसुंगी पुलाजवळील अपेक्षा लॉन्स येथे केली.

फुरसुंगी येथील रोहित रामकिशन केंडे Rohit Ramkishan Kende (वय-34 रा. मल्हार बिल्डिंग, फुरसुंगी) यांच्या घरी 9 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत अज्ञात चोरटयांनी चोरी केली होती.
याप्रकरणी त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar police station) फिर्याद दिली होती.
पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करुन आरोपींना पकडण्यासाठी दोन पथके तयार केली होती.

पोलिसांकडून तपास सुरु असताना तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, आरोपींची देहबोली आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपास सुरु केला. दरम्यान, फुरसुंगीतील घरफोडी करणारे दोन मुले अपेक्षा लॉन्स (Apeksha Lawns) येथे मायस्ट्रो मोपेडवरुन (Maestro moped) येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा (Pune Crime) रचून दोघांना ताब्यात घेतले.
त्यांची अंगझडी घतेली असता घरफोडीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने त्यांच्याकडे मिळून आले.
घराचे कुलूप तोडून चोरी करुन चोरीचा मुद्देमाल वाटून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने (PSI Saurabh Mane) करीत आहेत.

 

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण (Additional Commissioner of Police Namdev Chavan), पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Senior Police Inspector Balkrishna Kadam),
पोलीस निरीक्षक राजू अडागळे (Police Inspector Raju Adagale), दिगंबर माने (Digambar Mane) यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड (API Hanumant Gaikwad), पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ,
निखील पवार, प्रशांत टोणपे, रियाज शेख, सचिन गोरखे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

 

Web Title : pune crime | pune police detained 2 criminals hadapsar police done good work

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Diabetes | डायबिटीज रुग्णांनी आवश्य खावी ‘ही’ वनस्पती, ब्लड शुगर होईल नियंत्रित; जाणून घ्या

Sharad Pawar | ‘आमची पोरं काय करतील याचा नेम नाही’ शरद पवारांनी सांगितला जयंत पाटलांच्या मुलाचा ‘किस्सा’

RIL | रिलायन्सची जर्मनीच्या नेक्सवेफमध्ये (NexWafe) गुंतवणूक, डेन्मार्कच्या स्टीसडलसह (STIESDEL) सामरिक भागीदारी