Pune Crime | सिंहगड रोड परिसरातील नर्‍हेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 28 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सिंहगड रोड परिसरातील नऱ्हे भागात चालणाऱ्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर (Gambling Den) पोलिसांनी छापा मारुन 28 जुगाऱ्यांना बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 59 हजार 650 रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई नऱ्हे येथील श्री कंट्रोल चौकातील (Shree Cantrol Chowk Narhe) वरद रेस्टो बारच्या (Varad Resto Bar) इमारतीच्या पार्किंगमध्ये परिमंडळ 3 (Unit 3) व सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील (Sinhagad Road Police Station) अधिकारी आणि कर्मचऱ्यांनी (Pune Crime) केली.

 

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी किसन चव्हाण (Kisan Chavan) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सागर कडू (Sagar Kadu), प्रवीण चौधरी (Praveen Chaudhary), अनुप चव्हाण (Anup Chavan), संकेत शिळीमकर (Sanket Shilimkar) यांच्या मदतीने तीन पत्ती जुगार सुरु असल्याने त्यांच्याही विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

नऱ्हे येथील श्री कंट्रोल चौकातील वरद रेस्टो बारच्या पार्किंगमध्ये जुगाराचा अड्डा सुरु
असल्याची माहिती परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांना मिळाली.
त्यानुसार रविवारी (दि.30) सायंकाळी सातच्या सुमारास छापा मारला.
या कारवाईत 28 जुगाऱ्यांना अटक करुन 59 हजार 650 रुपये रोख रक्कम, तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad),
पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे (Police Inspector Pramod Waghmare)
यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले (API Chetan Thorbole),
पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ (PSI Kuldeep Sankapal),
नितीन जाधव (PSI Nitin Jadhav) व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police raid gambling den at Narhe in Sinhagad Road area, take action against 28 persons

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Caste Validity Certificate | जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम

 

Cheslie Kryst Suicide | 60 मजली इमारतीवरून उडी मारून ‘या’ प्रसिद्ध मॉडेलनं केली आत्महत्या, टोकाचं पाऊल उचलण्यापुर्वी केली होती सोशल मीडियावर पोस्ट

 

Sangli Crime | तासगाव-भिलवडी रोडवर छोटा हत्तीची तिघांना धडक; RTI कार्यकर्ता संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह दोघांचा मृत्यू