Pune Crime | पुणे पोलिसांचा गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा ! एकाच दिवशी 7 गुंडांना केले तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहर पोलिसांनी (Pune City Police) गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी गुंडांवर (Pune Criminals) कारवाईचा धडाका सुरु केला आहे. मागील काही दिवसांत पोलिसांनी अनेक गुंडांवर तडीपारीची (Deported) कारवाई केली आहे. यामध्ये काही गुन्हेगारी टोळ्यांचा (Criminal Gang) समावेश आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांनी एकाच दिवशी 7 सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे. एका पोलीस परिमंडळातील 7 गुंडांना एकाच दिवशी तडीपार करण्याची ही बहुदा पहिलीच (Pune Crime) वेळ आहे.

 

पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचा प्रभाव असणाऱ्या ठिकाणी सराईत गुंडांकडून मारामारी, हप्ता वसुली, विनाकारण नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच या गुडांमुळे संबंधीत परिसरातील कायदा सुव्यवस्था (Law and Order) आणि शांतता धोक्यात येत आहे. परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारे कारवाईचा बडगा उगारला आहे. (Pune Crime)

परिमंडळ चार मधील चंदननगर (Chandan Nagar Police Station), येरवडा (Yerawada Police Station), लोणीकंद (Lonikand Police Station), विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Vimantal Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या 7 गुंडांना पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी एक ते दोन वर्षासाठी तडीपार केले आहे.

 

वाघोली (Wagholi), केसनंद (Kesnand), विमान नगर परिसरात दहशत पसरविणारे सत्यवान उर्फ अप्पा श्रीमंत घाडगे Satyawan alias Appa Shrimant Ghadge (वय 24), आकाश अशोक राठोड Akash Ashok Rathod (वय 22, दोघे रा. गोरे वस्ती, वाघोली) तसेच चंद्रकांत पोपट शिवले Chandrakant Popat Shivale (वय 24, रा. तुळापूर, पो. फुलगाव, ता. हवेली) यांना 1 वर्षांसाठी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

 

सच्छिदानंद ऊर्फ सोन्या शंकर कुसळ Sachchidanand alias Sonya Shankar Kusal (वय 25, रा. चंदननगर)
याला 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. सागर सहदेव म्हस्के Sagar Sahadeva Mhaske (वय 31, रा. विठ्ठल नगर, वडगाव शेरी)
याला शहर व जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

येरवडा परिसरात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार वृषभ बाबा पिसे Vrishabha Baba Pise (वय 25, रा. कामराज नगर, येरवडा)
याला पुणे शहर व जिल्ह्यातून 2 वर्षांकरीता तडीपार करण्यात आले.
तर विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार रवींद्र दादु रणसिंग Ravindra Dadu Ransingh (वय 23, रा. विमाननगर)
याला एक वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Take Strong Action Against Criminals In
Singal Day DCP Rohidas Pawar Deported seven goons

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा