Pune Crime | डीआरआयनं 3.75 कोटींचा गांजा जप्त केल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथक ‘सुसाट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात directorate of Revenue Intelligence डीआरआयने 3.75 कोटींचा गांजा पकडल्यानंतर आता “गुन्हे शाखेला जाग आली असून, गेल्या दोन दिवसांपासून गांजा कारवाईला भलताच वेग आणला आहे. दोन दिवसांपुर्वी 40 किलो आणि आज 21 किलो असा दोन वेळा गांजा पकडला आहे. अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी डीआरआयच्या कारवाईनंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची झाडाझडती घेतली आहे. त्यामुळे वातावरण सध्या ‘गरम’ आहे.

पुणे पोलिसांच्या (Pune Police) अमली पदार्थ विरोधी पथकाने (anti narcotics cell) आज वाघोली परिसरात तिघांना अटक केली आहे. ते गांजा विक्री करण्यासाठी आले असल्याचे समजले होते. अक्षय अंबादास बिडगर (वय 25), सोनल किसन काळे (वय 19), सागर गोपीनाथ पोले (वय 19, रा सर्व, अहमदनगर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. त्यांच्याकडून सव्वा चार लाख रुपयांच्या ऐवजासह 21 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (senior police inspector vinayak gaikwad) यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

दरम्यान, पुणे सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) डीआरआय directorate of Revenue Intelligence पथकाने फळांची वाहतूक करणार्‍या ट्रकधून गांजा वाहतूक होत असल्याचे उघडकीस आणले होते. त्यात 3.75 कोटींचा गांजा पकडला गेला. इतक्या मोठ्या प्रमाणात डीआरआयने गांजा पकडल्याने अमली पदार्थ विरेाधी पथकाच्या पोलिसांच्या कामगिरीसोबतच पुण्यातील अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ तस्करी होत असल्याचे यापूर्वी देखील अनेकवेळा समोर आले आहे. अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे दोन स्वतंत्र पथक आहेत. त्यांच्याकडून अधूनमधून कारवाई केली जाते. त्यातही ही कारवाई नायजेरियनपर्यंत मर्यादित असते. पण, शहरात गांजा आणि इतर प्रकार ठिकठिकाणी सुरू आहेत. गांजा तर गल्ली बोळात देखील विकला जात असल्याची चर्चा आहे. बांधकाम मजूर, कामगार व परराज्यातील आलेले कामगार वर्ग हा या गांजा तस्करांचा खरा ग्राहक आहे.

मात्र असे असताना देखील अमली पदार्थ विरोधी पथकांच काम धिम्या गतीने आणि अधूनमधूनच सुरू असल्याचे पाहिला मिळते.
एखादं दुसरी कारवाई केल्यानंतर महिनाभर पथक ‘रूटीन’ कामकाजात असते.
खंडीभर कर्मचाऱ्यांची फौजही मग पेट्रोलिंग आणि कारवाईच्या नावावर ‘विशेष’ कामगिरी करत फिरतात.
दरम्यान नुकत्याच डीआरआयने कारवाईनंतर अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष गेले आणि त्यांनी झाडाझडती घेतली.
त्यानंतर सलग दोन दिवस या पथकांनी गांजा तस्करी करणार्‍यांना पकडले आहे.
त्यामुळे आता आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title :- Pune Crime | Pune police’s anti-narcotics cell active after DRI seizes Rs 3.75 crore cannabis in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Healthy Diet | मान्सूनमध्ये तळलेल्या-भाजलेल्या पदार्थांनी होईल नुकसान,
आजारांपासून बचावासाठी ‘या’ 7 गोष्टींचे करा सेवन; जाणून घ्या

Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्री म्हणाले – ‘उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा’; अनेकांच्या भुवया उंचावल्या (व्हिडीओ)

BJP MLA Atul Bhatkhalkar | ‘मुंबईत पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत’, भाजपचा हल्लाबोल