Pune Crime | लग्नाच्या आमिषाने बलात्कार अन् महिलेची 57 लाखाची फसवणूक, धानोरी व चाकणमधील जमीनी हाडपल्या, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | म्हाडामध्ये (MHADA Pune) घर मिळवून देतो, असे सांगून एकाने महिलेकडून रोकड व 40  तोळे सोने असे 57  लाख रुपये घेतले. तुझा व तुझ्या मुलाचा सांभाळ करेन, असे आमिष दाखवून (Lure Of Marriage) जबरदस्तीने शारीरीक संभोग (Pune Rape Case) केला. धानोरी (Dhanori), माणकगाव (Makangaon) येथील जमिनीचे व चाकण (Chakan) येथील फ्लॅटची मुळ कागदपत्रे जबरदस्तीने लिहून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी एका 34 वर्षाच्या महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. 76/22) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संतोष पवार Santosh Pawar Medha (रा. मेढा, ता. जावळी, जि. सातारा Satara) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च 2020 ते जानेवारी 2022 दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष पवार याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यांना म्हाडामध्ये घर घेऊन देतो, असे सांगून त्यांच्याकडून 41 लाख 68 हजार 700 रुपये घेतले. तसेच अंदाजे 16 लाख रुपयांचे 40 तोळे सोने असे एकूण 57 लाख 68 हजार 700 रुपये घेतले. पण घर मिळवून दिले नाही. तेव्हा त्यांनी पैशांची मागणी केली. पैसे देण्यासाठी पवार याने त्यांना बोलावून घेतले. तुझा व तुझ्या मुलाचा सांभाळ करेन, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्याशी लग्न करणार आहे, असे आश्वासन देऊन त्यांच्याबरोबर जबरदस्तीने शारीरीक संभोग केला. तू जर माझेविरुद्ध तक्रार केली तर तुझे नग्न फोटो व व्हिडिओ व्हायरल करेन (Nude Photo And Videos), अशी धमकी दिली. फिर्यादी यांचे धानोरी, माणगाव येथील जमिनीचे व चाकण येथील फ्लॅटची मुळ कागदपत्रे म्हाडामध्ये फ्लॅट घेण्यासाठी लागणार आहेत, असे सांगून ती जबरदस्तीने घेऊन या जागेचे सत्यप्रतिज्ञापत्र, संमतीपत्र जबरदस्तीने लिहून घेतले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Pune Rape Case Cheating of Rs 57 lakh, land grabbing in Dhanori and Chakan, Farud Case Vishrambaug Police Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त