Pune Crime | सहायक पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलातील मंचर पोलीस ठाण्यात (Manchar police station) सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) म्हणून कार्यरत असणाऱ्या एकनाथ ठकाजी वाजे Eknath Thakaji Waje (वय-53) यांनी राहत्या घरात गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केली (Committed suicide). एकनाथ वाजे यांनी बुधवारी (दि.25) दुपारच्या सुमारास राजगुरुनगर जवळील चांडोली येथील घरात आत्महत्या (Pune Crime) केली. याबाबतची माहिती त्यांचे जावई आदित्य रविंद्र गभाले Aditya Ravindra Gabhale (वय-25) यांनी खेड पोलीस ठाण्यात (Khed Police Station) दिली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य गभाले यांची पत्नी सुप्रिया या सोमवारी (दि.23) माहेरी आल्या होत्या बुधवारी आदित्य यांची पत्नी सुप्रिया हिने त्यांना फोन करुन सांगितले की, वडीलांनी शेजारी असणाऱ्या 13 नंबर प्लॅटमध्ये स्वत:ला कोंडून घेतले असून, आम्ही बराच वेळ दरवाजा वाजवूनही ते दार उघडत नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास फ्लॅटचा दरवाजा तोडला. त्यावेळी एकनाथ वाजे यांनी बेडरुममधील हुकाला रस्सीने गळफास घेतल्याचे दिसले.(Pune Crime)

 

वाजे यांचा गळफास सोडून तातडीने ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून एकनाथ वाजे यांना मृत (Death) घोषित केले. वाजे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. वाजे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

 

Web Title :- Pune Crime | pune rural police assistant police sub inspector ASI eknath waje hangs himself to death

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Old Pune-Mumbai Road | खडकी कॅन्टोंन्मेंटच्या हद्दीतील जुन्या पुणे- मुंबई रस्त्याचे काम तातडीने सुरू होणार ! रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू

 

Avinash Bhosale | पुण्यातील सुप्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक

 

Pune PMC Tax | सर्वसाधारण सभेने दिलेली ‘सवलतीची’ उपसूचना फेटाळून ! प्रशासनाच्या प्रस्तावाप्रमाणेच समाविष्ट 23 गावांत करआकारणीचा महापालिकेचा निर्णय