Pune Rural Police | अल्पवयीन मुलांना वाहन देणे पालकांना पडले महागात, पोलिसांकडून पालकांवर खटले दाखल

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rural Police | अल्पवयीन मुलांचे विनापरवाना दुचाकी चालविणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे अपघातही होत आहेत. अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यास देणाऱ्या पालकांवर आता कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. बारामती शहरात अल्पवयीन मुलांना वाहन देणाऱ्या 18 पालकांवर पोलिसांनी (Pune Rural Police) खटले दाखल करत ते न्यायालयासमोर सादर केले आहेत. बारामती येथे पालकांविरुद्ध खटले दाखल झाल्यामुळे जिल्ह्यामध्येही इतर ठिकाणी अशा प्रकारची कारवाई होण्याची शक्यता वाढली असून अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यासाठी देणे पालकांना चांगलेच महागात पडणार आहे.

बारामती शहरामध्ये अल्पवयीन मुलांना दुचाकी देण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाविद्यालयीन तरुण मंडळी अत्यंत बेदरकारपणे दुचाकी चालवतात. शाळा-महाविद्यालयांत दुचाकी घेऊन येतात. दुचाकीवर दोनपेक्षा जास्त जण बसतात. तसेच कर्णकर्कश हॉर्न वाजवतात. सायलेंसरचा मोठा आवाज काढतात. पोलिसांकडून अशा तरुणांवर कारवाई केली जात आहे. मात्र हे प्रमाण कमी न होता वाढत चालले आहे. पालकांचा मुलांवर धाक राहिला नसल्याने पोलिसांनी पालकांवरच खटले दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास दिल्यास अथवा मुलांकडून अपघात झाल्यास पालकांवर कायदेशीर
कारवाई करण्याची कायद्यात तरतूद आहे. या तरतुदींची अंमलबजावणी करत दोन दिवसांमध्ये बारामती शहर
पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक शाखेने 18 पालकांवर खटले दाखल केले आहेत.
हे खटले न्यायालयापुढे सादर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title :- Pune Rural Police | pune rural police baramati traffic police takes action against 18 parents for their childrens driving pune crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray – BMC Elections | मनपा निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरेंचा शिवसैनिकांना कानमंत्र, म्हणाले – ‘जिंकण्यासाठी मैदानात उतरूया, बीएमसी आपल्याकडेच राहणार’

Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…