Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांकडून लोणावळयातील हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दिल्लीच्या 2 मुली आढळल्या; प्रचंड खळबळ

पुणे / लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) लोणावळा परिसात सुरु असलेल्या वेश्या (prostitution) व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दोन मुलींची सुटका केली असून एका दलालास अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रविण मोरे (PI Pravin More) यांनी दिली. ही कारवाई (Pune Crime) लोणावळा ग्रामीण पोलीस (lonavala rural police station) आणि दहशतवाद विरोधी पथकाने ATS (Anti-terrorism squad) संयुक्तरित्या केली.

 

 

जय उर्फ धनंजय कातवारू राजभर (वय 37, रा. नांगरगाव लोणावळा, मूळ रा. टिळक नगर, चेंबूर, मुंबई) असे अटक केल्याचे नाव आहे. आरोपी धनंजय हा लोणावळा येथील एका महिलेसोबत हे रॅकेट चालवण्याचे काम असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस त्या महिलेचा शोध घेऊन बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई (Pune Crime) केली आहे.

 

 

व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून दर ठरवला जात होता. दर ठरल्यानंतर त्या मुलींना मोटारीतून लोणावळा परिसरातील ग्राहकांकडे (Pune Crime) पाठवले जात होते. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

 

 

पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे जय उर्फ धनंजय यांच्याशी व्हॉट्सअपवर संपर्क साधला. त्याने व्हॉट्सअप वर मुलींचे फोटो पाठवून दर ठरवला. यानंतर त्याने या मुलींना तो मनशक्ती वरसोली, लोणावळा (Manashakti Versoli, Lonavla) येथे घेऊन येतो, असे सांगितल्यानंतर पोलीसांनी सापळा रचला. आरोपी हा मोटारीतून दोन मुली घेऊन तेथे आला. बनावट ग्राहकाने इशारा करताच पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. दोन्ही मुली दिल्ली (Delhi) येथून वेश्या व्यवसायासाठी आणल्या होत्या. या मुलीची सुटका केली असून लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.

 

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Addl SP Mitesh Ghatte),
अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते (Addl SP Milind Mohite),
उपविभागीय पोलिस अधिकारी लोणावळा राजेंद्र पाटील (Sub-Divisional Police Officer Rajendra Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे,
पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते (API Arjun Mohite),
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पवार (API Rajesh Pawar), विश्वास खरात, पोलीस हवालदार ईश्वर जाधव,
पोलीस नाईक विशाल भोरडे, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख,
लक्ष्मण राऊत व स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB, Pune Rural) सुजाता कदम,
पुनम गुंड तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे युवराज बनसोडे, पुष्पा घुगे, सिद्धेश्वर शिंदे आदीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :-  Pune Crime | Pune rural police bust high-profile prostitute racket in Lonavla, 2 Delhi girls found; Huge excitement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Band | शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ‘महाविकास’ आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हावे – आ. वरपुडकर

BJP MLA Sunil Kamble | ‘त्या’ व्हायरल क्लिपची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू; पीडित महिला अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला

Maharashtra Band | ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त