Advt.

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात चक्क जनरल स्टोअर्समध्ये गांजाची विक्री; ‘शौर्य’चा वैभव वनवे ‘गोत्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जनरल स्टोअर्सच्या (General Stores) नावाखाली गांजाची विक्री करणाऱ्या एकाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) हवेली पोलिसांनी (Haveli Police) बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि.14) मौजे खानापूर (Khanapur) येथे करण्यात आली. आरोपीकडून 17 हजार 720 रुपयांचा गांजा जप्त (Cannabis Seized) केला आहे. वैभव विठ्ठल वनवे (Vaibhav Vitthal Vanve) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Crime)

 

हवेली पोलीस ठाण्यातील (Haveli Police Station) दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले (SDPO Bhausaheb Dhole) यांना खानापूर (Khanapur) येथील शौर्य जनरल स्टोअर्समध्ये गांजा असून त्याची ग्राहकांना चोरुन विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचासह दुकानावर छापा टाकला. वैभव वनवे याच्या दुकानातून एका कापडी पिशवीत लहान मोठ्या 60 प्लास्टिकच्या पिशवीत भरुन ठेवलेला 798 ग्रॅम वजनाचा गांजा आणि रोख रक्कम जप्त केला. (Pune Crime)

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Addl SP Mitesh Ghatte) यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार (Police Inspector Sadashiv Shelar), सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम (API Nitin Nam), पोलीस उपनिरीक्षक प्रदीप नांदे (PSI Pradeep Nande), ए.ए. शिंदे, पोलीस हवालदार कोळेकर, धनवे, काळे यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Pune Rural Police Haveli Police Arrested Vaibhav Vitthal Vanve in NDPS Case Cannabis Seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rohit Pawar | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर टिका करणार्‍या भाजप नेत्यांना आमदार रोहित पवार यांनी दिले ‘हे’ उत्तर

 

Pune Crime | ‘फ्रेंडशिप’साठी भर रस्त्यात धरला हात, भावांनी धु धु ‘धुतला’ ! कस्तुरी चौकातील घटनेत तरुणाला केली अटक

 

Pune Crime | भावाच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी त्याच्या प्रेयसीच्या मुलाचे कल्याणीनगरमधून अपहरण; पुणे पोलिसांकडून चौघांना अटक

 

Wardha Crime | आर्वीतील बहुचर्चित अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. रेखा यांचे पती डॉ. नीरज कदमला अटक

 

Pune Crime | पुण्यात 25 वर्षीय वहिनीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ केला सावत्र दीरानं शूट, त्यानंतर धमकी देऊन बलात्कार; हिंजवडी परिसरातील घटना