Pune Crime | जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 11 लाखांच्या मुद्देमालासह 33 जणांना अटक

पुणे / वडगाव मावळ : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अवैधरित्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) वडगाव मावळ पोलिसांनी (Wadgaon Maval Police) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कमेसह 11 लाख 59 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 33 जणांना ताब्यात (Arrest) घेतले आहे. तर दोन आरोपी फरार झाले आहेत. वडगाव मावळ पोलिसांनी ही कारवाई सोमवारी (दि.24) रात्री 8 वाजता गिरी पोल्ट्री जवळ, मोरया कॉलनी (Moraya Colony) येथे केली.

 

पोलीस निरीक्षक विलास भोसले (Police Inspector Vilas Bhosale) यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव मावळ हद्दीत गिरी पोल्ट्री जवळ, मोरया कॉलनी, संतोष रामदास ढोरे (Santosh Ramdas Dhore) यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून जुगार अड्ड्यावर छापा (Police Raid) टाकून 33 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये 2 चारचाकी वाहने, 3 दुचाकी, 33 मोबाईल, 25 हजार रोख असा एकूण 11 लाख 59 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात 33 जणांना अटक केली असून सागर पांडुरंग वायकर (Sagar Pandurang Vaikar) आणि संतोष रामदास ढोरे हे फरार झाले आहेत.(Pune Crime)

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक मित्तेश घट्टे (Addl SP Mittesh Ghatte) , लोणावळा उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील (Lonavla SDPO Rajendra Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास भोसले, पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे (PSI Santosh Chame), पोलीस कर्मचारी सुनील जावळे, अजित ननावरे, आशिष काळे, अमोल तावरे, मनोज कदम, अमोल ननावरे, श्रीशल्य कंटोळी, शैलेश खोपडे, संजय सुपे, गणपत होले, अजय शिंदे, अनिकेत बोऱ्हाडे, शिवाजी घुटे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Pune Rural Police raid on gambling den in wadgaon maval 11 lakh confiscated 33 arrested

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा