Pune Crime | महिलेचा अश्लील व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करुन केला व्हायरल, उत्तर प्रदेशातील तरुणावर FIR

पुणे / कुरकुंभ : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महिलेचा अश्लील व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करुन तो व्हायरल केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील एका तरुणावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमलसिंग राजपुत (वय-27 रा. कुरकुंभ, मुळ रा. आग्रा, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 28 वर्षीय पीडित महिलेने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.25) दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे घडला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलसिंग राजपुत याने फिर्यादी महिलेच्या सहमतीशिवाय तिचा अश्लील व्हिडिओ
कॉल रेकॉर्ड केला. त्यानंतर माझ्यासोबत राहायला ये अशी धमकी दिली.
त्यास नकार दिला असता आरोपीने महिलेचा मानलेल्या भावच्या फेसबुकवर तो व्हिडिओ पाठवला.
तसेच महिलेच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला. हा प्रकार महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांत धाव घेत
आरोपी विरुद्ध फिर्याद दिली. पुढिल तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करीत आहेत.

Web Title :-   Pune Crime, Pune Rural Police, Record Obscene Video Calls, Daund Police Station, FIR, Police Inspector Bhausaheb Patil, Uttar Pradesh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘या सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीये का?’; रामदेव बाबांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांच्या शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Uday Samant | ठाकरे गटाची चिंता वाढणार? उदय सामंतांचा मोठा दावा, म्हणाले – ‘गुवाहाटीवरून परत येताना आमच्यासोबत’

Chandrakant Patil On Maharashtra Karnataka Border Issue | सीमावादावरील गावांसाठी 2 दिवसांत मोठी घोषणा – चंद्रकांत पाटील