Pune Crime | पुणे ग्रामीणची मोठी कारवाई ! यवत पोलिसांकडून पाटस परिसरात 50 लाखांच्या गांजासह 7 पुरुष आणि 5 महिलांना अटक

पुणे / यवत : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) पाटस परिसरात रविवारी (दि.26) मध्यरात्रीच्या सुमारास 50 लाखांचा गांजा जप्त (Cannabis Seized) केला असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे (Yavat Police Station) पोलीस निरीक्षक नारायण पवार (Police Inspector Narayan Pawar) यांनी दिली आहे. याप्रकरणी महाराष्ट्रासह (Maharashtra) आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) येथील 7 पुरुष आणि 5 महिलांना अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई (Pune Crime) मध्यरात्री एकच्या सुमारास करुन एक मालवाहतूक ट्रक ताब्यात घेतला आहे.

 

आरोपींनी हा गांजा पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) काही दुकानात आणि मुंबईत (Mumbai) विक्रीसाठी आणण्यात आला होता, असा संशय पोलिसांना असून यामध्ये जिल्ह्यातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. पुणे आणि मुंबई येथे विक्रीसाठी ट्रकमधून गांजाच्या पिशव्या नेल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाटस (Patas) परिसरात सापळा रचून मिळालेल्या नंबर वरून ट्रक आडवला.

 

ट्रकची तपासणी केल्यावर ट्रकच्या केबिनमध्ये गांजाच्या पिशव्या आढळून आल्या.
त्यामध्ये तीस लाख रुपये किंमतीचा पावणे दोनशे किलो गांजा होता.
पोलिसांनी ट्रक आणि गांजा असा एकूण 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण (Pune Rural Police) पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते (Addl SP Milind Mohite), उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस (SDPO Rahul Dhas) यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे (API Keshav Wable), पोलीस उपनिरीक्षक पदमराज गंपले (PSI Padmaraj Gample), पोलीस नाईक गणेश सोनवणे, विशाल गजरे, विकास कापरे, पोलीस हवालदार जे.एम. भोसले, भानुदास बंडगर, रविंद्र गोसावी, मेघराज जगताप, महेंद्र चांदणे, नुतन जाधव, प्रमोद गायकवाड, सुजित जगताप, दिपक यादव, तात्याराम करे, गणेश मुटेकर, आनंद आहेर, धावडे, चालक सत्यवान जगताप, विजय आवळे, पोलीस मित्र रामा पवार, निखिल अवचट यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Pune Rural Yavat Police crackdown daund two hundred kilos cannabis worth rs 78 lakh seized arrest 12

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NPS Traders | राष्ट्रीय पेन्शन योजना देते छोट्या व्यापार्‍यांना वृद्धत्वात पेन्शनचा आधार, जाणून घ्या सरकारी योजनेचा कसा घ्यायचा लाभ

Amitabh Bachchan | शोलेच्या शूटिंग दरम्यान बिग बींनकडून ‘हि’ अभिनेत्री राहिली प्रेग्नेंट

 

Pune Crime | क्लिप पाहून 12 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणार्‍या 5 जणांकडून 15 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार; पुण्यातील घटना