Pune Crime | गोळीबार करुन 3.6 कोटी लुटणाऱ्या टोळीकडून मोठे घबाड ग्रामीण पोलिसांच्या हाती, तिघांकडून मिळाले 2 कोटी 1 लाख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway) भिगवन जवळ वरकुटे बुद्रुक हद्दीत शुक्रवारी (दि.26 ऑगस्ट) पहाटे चारचाकी गाडीवर गोळीबार (Firing) करुन तब्बल साडेतीन कोटी रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch) आणि इंदापूर पोलिसांनी (Indapur Police) बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह सहा जणांना पोलिसांनी 72 तासाच्या आत अटक (Arrest) करुन लुटीतील रक्कम (Pune Crime) जप्त केली आहे. पोलिसांनी कुर्डुवाडी परिसरातून अटक केलेल्या तीन आरोपींकडून 1 कोटी 43 लाख 20 हजार रुपये जप्त केले आहेत. तर राजस्थान येथून अटक केलेल्या तीन आरोपींकडून 2 कोटी 1 लाख 10 हजार रुपये असे एकूण 3 कोटी 44 लाख 30 हजार रुपये आतापर्यंत जप्त केले आहेत.

 

टोळीचा प्रमुख सागर शिवाजी होनमाने (वय-34 रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर), बाळु उर्फ ज्योतिराम चंद्रकांत कदम (वय-32 रा. कुर्डुवाडी), रजत अबू मुलाणी (वय-24 रा. न्हावी, ता. इंदापूर), गौतम अजित भोसले (वय-33 रा. वेने ता. माढा), किरण सुभाष घाडगे (वय-26 रा. लोणीदेवकर, ता. इंदापूर), भूषण लक्ष्मीकांत तोंडे (वय-25 रा. लोणीदेवकर) या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत भावेशकुमार अमृत पटेल Bhaveshkumar Amrit Patel (रा. कहोडा, ता. उंझा, जि. मेहेसाना, गुजरात) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात (Indapur Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी मुख्य आरोपी सागर होनामाने, ज्योतीराम कदम आणि रजत मुलाणी या तिघांना कुर्डुवाडी परिसरातून अटक केली. तर गौतम भोसले, किरण घाडगे, भूषण तोंडे या तिघांना राजस्थानमधील (Rajasthan) उदयपुर (Udaipur) परीसरातून ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भावेशकुमार पटेल यांचा कुरियर सर्व्हिसेस (Courier Services) चा व्यवसाय आहे. 26 ऑगस्ट रोजी पटेल हे नांदेड (Nanded), लातूर (Latur) व सोलापूर (Solapur) येथील पार्सल घेऊन सोलापूर पुणे महामार्गावरुन चारचाकीमधून मुंबईला जात होते. इंदापुर टोल नाक्याच्या पुढे वरकुटे पाटी येथे गतिरोधक जवळ गाडीचा वेग कमी केला. पहाटे अडीचच्या सुमारास सहा जणांनी पटेल यांच्या गाडीजवळ येत त्यांना रॉड दाखवत अडवण्याचा प्रयत्न केला.

 

पटेल यांनी त्यांच्या गाडीचा वेग वाढून वेगात पुढे निघून गेले. त्यावेळी आरोपींनी दोन चारचाकी वाहनातून पटेल यांच्या गाडीचा सात ते आठ किमी पाठलाग केला. पटेल यांच्या स्कॉर्पिओ गाडीवर गोळीबार केला. त्या दरम्यान पाठलाग करणाऱ्या दुसऱ्या चारचाकी गाडीने पटेल यांच्या गाडीला आडवी मारुन फिर्यादी यांची गाडी थांबवली. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या सोबत असलेल्या विजयभाई सोलंकी यांना मारहाण करुन गाडीमधून खाली उतरवत दुसऱ्या गाडीत बसवले. त्यानंतर गाडीत ठेवलेली तीन कोटी 60 लाख 26 हजार रुपयांचा दरोडा टाकून चोरुन नेला.

 

या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख (SP Abhinav Deshmukh) यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके (Police Inspector Ashok Shelke) यांनी तापासाच्या सूचना दिल्या. आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन तपास पथके तयार करण्यात आली. तसेच इंदापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे (Police Inspector Prabhakar More) यांनी स्वतंत्र तीन तपास पथके तयार केली.
आरोपींचा सहा पथकाकडून तपास सुरु असताना हा गुन्हा
सागर होनमाने याने त्याच्या इतर साथिदारांच्या मदतीने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
पथकाने कुर्डुवाडी परिसरात आरोपींचा शोध घेऊन सागर होनमाने, ज्योतीम कदम आणि रजत मुलाणी यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन त्यांच्या इतर साथीदारांची माहिती दिली.

पोलिसांनी सागर होनमाने याच्याकडून 72 लाख तर
रजत मुलाणी याच्याकडून 71 लाख 20 हजार रुपये असा एकूण 1 कोटी 43 लाख 20 हजार रुपये जप्त केले.
तर राजस्थान येथून अटक करण्यात आलेल्या गौतम भोसले,
किरण घाडगे, भुषण तोंडे या तिघांकडून 2 कोटी 1 लाख 10 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.
या तिघांना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या (Pratap Nagar Police Station) हद्दीतून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले होते.
या गुन्ह्यात आतापर्यंत 3 कोटी 44 लाख 30 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

गुन्ह्यात दरोडा टाकण्यात आलेली 15 लाख 70 हजारांची रोकड अद्यापही आरोपींकडून जप्त करायची आहे.
त्यांनी त्या रकमेचा कोठे उपयोग केला. त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का?
अंगडीयांच्या गोटातून नेमकी माहिती कोणी लिक केली याचाही तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | pune rurarl police arrested three people and seized 2 crore one lakh in pune solapur highway robbery

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Price Today | सोन्यात 47 रुपयांची तेजी, चांदीत 496 रुपयांची उसळी; जाणून घ्या नवीन दर

 

Dasara Melava 2022 | दसरा मेळाव्यावरुन राजकारण पेटले ! शिंदे गटाने अर्ज दाखल करुन ठाकरे गटाला दिले आव्हान

 

ACB Trap on PSI Dilip Sapate | 45 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक दिलीप सपाटे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Devendra Fadnavis On NA | ‘शहरांमधील रहिवास क्षेत्रातील जमिनींना पुन्हा एनए करण्याची गरज नाही; लवकरच निर्णय घेण्यात येणार’ – देवेंद्र फडणवीस