Pune Crime | पुण्यातील टिळक रोडवर भरचौकात 2 गटात तुफान राडा; कोयत्याचे वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील टिळक रोडवर (Tilak Road) गुंडांच्या दोन गटातील तरुणांमध्ये तुफान राडा (Attack) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात दिवसाढवळ्या ऐन गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. जोंधळे चौक (Jondhale Chowk) भागात 10 ते 12 जणांच्या दोन टोळक्याने एकमेकांवर हल्ला चढवला. तरुणांनी परस्परांवर कोयता आणि दगडाने वार करत मारहाण (Beating) केल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाच जणांना ताब्यात घेतले, तर काही जण पसार झाले आहेत. या हल्ल्याचे नेमकं कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक (Pune Crime) अंदाज वर्तवला जात आहे.

 

या घटनेत काही तरुण जखमी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे पोलीस घटनास्थळावर दाखल झाल्यावर आरोपींनी पोलिसांवरही हल्ला केल्याची माहिती आहे. पोलिसांनी जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल केले आहे. सपा महाविद्यालयाजवळील (SP College) टिळक रोड सारख्या गजबजलेल्या परिसरात हा प्रकार घडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune Crime)

 

नेमकं काय घडलं ?

सिंहगड परिसरातून सहाजण रिक्षातून कुमठेकर रोडवर (Kumthekar Road) आले आणि त्याठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते टिळक रोडवर आले आणि त्या ठिकाणी उभे असलेल्या एकाला कोयत्याने मारहाण केली. असे एकूण तीन जणांवर हल्ला केला. घटनास्थळी पोलीस पकडण्यासाठी गेले असता एका कर्मचाऱ्याला देखील चावा घेतला. पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले आहे, इतर पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

घटनेच्या वेळी रस्त्यावर मोठी वर्दळ होती. मात्र टोळक्यातील तरुणांची आक्रमकता पाहून कोणी मध्ये पडण्याची हिंमत केली नाही.
बघ्यांनी ही घटना मोबाईलमध्ये कैद केल्यानंतर याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
उपस्थित नागरिकांनी या घटनेची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambag Police Station) दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल माने (Police Inspector Sunil Mane) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | pune tilak road chowk two groups ruckus attack with knife stone axel video viral crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा