Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police) अटक (Arrest) केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल (Pistol) आणि एक जिवंत काडतुस (Cartridge) जप्त केली आहेत.विमानतळ पोलिसांनी ही कारवाई बुधवारी (दि.1) लोहगाव परिसरातील फॉरेस्ट पार्क (Pune Crime) येथे केली.

 

संतोष शंकर गुंजाळ Santosh Shankar Gunjal (वय-26 रा. दगडी हौदाजवळ, माळवाडी, हडपसर) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विमानतळ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील कर्मचारी पोलीस नाईक सचिन जाधव (Police Naik Sachin Jadhav) व प्रदिप मोटे (Pradip Mote) यांना लोहगाव परिसरातील मोकळ्या जागेत असलेल्या मोठ्या पाईपमध्ये एक जण बसला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक काडतुस सापडले. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश शेवाळे (ASI Avinash Shewale) करीत आहे.(Pune Crime)

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहीदास पवार (DCP Rohidas Pawar), सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (Yerawada Division ACP Kishor Jadhav), वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav), पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप ( Police Inspector Mangesh Jagtap) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव, पोलीस अंमलदार अविनाश शेवळे, गणेश साळुंके, सचिन जाधव, प्रदिप मोटे, रुपेश पिसाळ, नाना कर्चे, गिरीष नाणेकर यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | pune viman nagar police arrest criminal who carry unlicensed pistol


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update