Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला विमानतळ पोलिसांकडून अटक, 1 पिस्टल 2 काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला विमातळ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून एक पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई (Pune Crime) पुणे-नगर रोडवरील खुळेवाडी कॉर्नर येथील मोकळ्या मैदानात शुक्रवारी (दि.25) करण्यात आली.

संतोष शंकर गुंजाळ (वय-26 रा. दगडी हौदाजवळ, माळवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर विमानतळ पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट, महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

विमानतळ पोलीस ठाण्यातील तपास पथक हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस नाईक गिरिष नाणेकर व सचिन जाधव यांना खुळेवाडी कॉर्नर येथील मोकळ्या मैदानात एकजण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल व काडतुसे असल्याची माहिती मिळाली. यावरुन पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता 50 हजार 200 रुपयांचे गावठी बनावटीचे एक पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपीने पिस्टल कोठून व कशासाठी आणले होते याचा तपास सहायक पोलीस फौजदार अविनाश शेवाळे करीत आहेत.

ही करावाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक,
अपर पोलीस आयुक्त (पुर्व) नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 शशिकांत बोराटे,
सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे,
पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे, पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे,
सचिन कदम, सचिन जाधव, उमेश धेंडे, गिरिष नाणेकर, अंकुश जोगदंडे, नाना कर्चे, रुपेश तोडेकर, योगेश थोपटे,
संजय आसवले यांच्या पथकाने केली.

Web Title :-  Pune Crime | pune viman nagar police police arrests youth carrying pistol without license, 1 pistol 2 cartridges seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Metro | शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या माहितीसाठी संकेतस्थळ विकसित

Vikram Gokhale Death | पुण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने सांगितली विक्रम गोखलेंबद्दलची आठवण; तीन महिन्यापूर्वी पोलिस स्टेशन मध्ये झाली होती भेट

Akola Crime | ‘मला सासु-सासऱ्यांनी मारहाण केलीय, मी आता…’, पोलिसांच्या 112 नंबरवर फोन करुन तरुणानं उचललं टोकाचं पाऊल