Pune Crime | प्रेमसंबंधाला नकार देणाऱ्या तरुणीचा भररस्त्यात विनयभंग, आरोपी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | प्रेमसंबंधाला (Love Affair) नकार देणाऱ्या तरुणीचा भररस्त्यात विनयभंग (Molesting Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रज्वल संजय जाधव Prajwal Sanjay Jadhav (वय – 22) याच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी (Pune Police) आरोपीविरुद्ध आयपीसी IPC 354 (D) 504,506 अन्वये गुन्हा दाखल (Pune Crime) करुन अटक केली आहे.

 

याबाबत 21 वर्षाच्या तरुणीने विश्रामबाग पोलिसांकडे तक्रार केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.8) सायंकाळी साडेचारच्या सुमारास कुमठेकर रोडवरील (Kumthekar Road) चित्र शाळा सोसायटीसमोर घडला आहे. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी नारायण पेठेत (Narayan Peth) राहणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रज्वल जाधव याने पीडित तरुणीकडे प्रेम संबंधाबाबत विचारणा केली होती.
मात्र तरुणीने त्याला नकार दिला. प्रेम संबंधास नकार दिल्याच्या रागातून आरोपीने तरुणीचा पाठलाग केला.
तसेच फिर्यादी तरुणीला शिवीगाळ करुन ‘तुझे करिअर खराब करतो’ अशी धमकी (Threat) दिली.
पीडित तरुणीने शनिवारी (दि.9) आरोपीविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी प्रज्वल जाधव याच्यावर गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Pune Vishrambaug Police Arrest Prajwal Sanjay Jadhav In molestation case narayan peth

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा