Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP रितेश कुमार यांची पहिली कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विश्रामबाग, दत्तवाडी, फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई (Pune Crime) करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत (MPDA Act) केलेली ही पहिलीच कारवाई आहे.

 

उमेश वसंत जंगम (वय-25 रा. नारायण पेठ, पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांसह विश्रामबाग (Vishram Bagh Police Station), दत्तवाडी (Dattawadi Police Station) व फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, पालघन, लोखंडी रॉड या सारख्या हत्यारांसह फिरताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), सदोष मनुष्यवध, दिवसा व रात्री घरफोडी (Burglary), गंभीर दुखापत करणे, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अशा कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यस्थेस बाधा निर्माण झाली होती. (Pune Crime)

 

आरोपीवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद (Senior Police Inspector Shabbir Syed) यांनी वरिष्ठांच्या मार्फत पोलीस आयुक्तांना दिला होता. प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपीला एमपीडीए कायद्यान्वये कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात (Kolhapur Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

 

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेखा वाघमारे (P.C.B. Crime Branch Senior Police Inspector Surekha Waghmare) यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune’s staunch criminal lodged in Kolhapur Jail, CP Ritesh Kumar’s first action under MPDA Act

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Annie Wersching | हॉलीवुडच्या ‘या’ अभिनेत्रीचे कॅन्सरने निधन; वयाच्या 45 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Cabinet Meeting | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले 15 महत्वाचे निर्णय, जाणून घ्या सविस्तर

Pune Crime News | जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक