Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार मुंबई कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 76 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या आदेशान्वये विश्रांतवाडी पोलिसांनी (Pune Police) एमपीडीए कायद्यांतर्गत (MPDA Act) अक्षय रवि नगरे याच्याविरुद्ध कारवाई (Pune Crime) केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आजपर्यंत तब्बल 76 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाईचा धडका सुरु केला आहे. अशातच विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या (Vishrantwadi Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा अट्टल गुन्हेगार अक्षय रवि नगरे Akshay Ravi Nagare (वय-23 रा. भिमनगर, विश्रांतवाडी, पुणे) याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. अक्षय नगरे याला एमपीडीए कायद्यान्वये मुंबई मध्यवर्ती कारागृहात (Mumbai Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे.

अक्षय नगरे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह विश्रांतवाडी, विमानतळ पोलीस
स्टेशनच्या (Vimantal Police Station) हद्दीमध्ये कोयता, तलवार, पालघन यासारख्या हत्यारांसह फिरत
असताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), घातक शस्त्रासह गंभीर दुखापत करणे, बेकायदा हत्यार बाळगणे
यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध 4 गंभीर गुन्हे (FIR) दाखल आहेत.

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अक्षय नगरे
याच्यावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर (Senior Police Inspector Dattatraya
Bhapkar), पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही कामगिरी केली.

Web Title :- Pune Crime | Pune’s staunch criminals lodged in Mumbai jail for one year, CP Amitabh Gupta takes action against 76 under MPDA Act

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Skin Treatment | पायांची शायनिंग वाढवण्याची आश्चर्यकारक पद्धत, घरीच घालवा’ हे’ काळे डाग

Yakub Memon Grave | याकूब मेमन कबरीवरुन राजकारण तापलं ! मग तुम्ही दाऊदला समर्थन करता का?, भाजपच्या आरोपांना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

CM Eknath Shinde | शिवसेना भवनाजवळच एकनाथ शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय